जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

गोधेगावात मोठी चोरी,पोलिसानी केले तीन तासात आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायत हद्दीतील कासली-गोधेगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेले शेतकरी कुटुंब हे दि.११ मार्चला ७.४५ वाजता जेवण करत असताना अज्ञात तीन चोरट्यानी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून,जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कडील मनिमंगळ सूत्रासह सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पळवून नेले असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली असता पोलिसानी या प्रकरणी तातडीने हालचाल करून आरोपीस गोधेगाव शिवारात कासली रोडला एक संशयित समाधान गोरक्ष ठोंबरे यास पकडले असता व त्यास पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने अन्य आरोपींची नावे सांगितल्याने पोलिसानी त्यांना तातडीने अटक केली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कोपरगाव येथील आरोपी ऋषिकेश शंकर पैठणकर,राजेंद्र लक्ष्मण जाधव (वय-२४) आदींना शोध मोहीम सुरु करून रात्रीच ताब्यात घेतले आहे.ऋषीकेश पैठणकर याच्या ताब्यात अंगझडतीत साठ हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र मिळून आले आहे.तर राजेंद्र लक्ष्मण जाधव हाही त्याच्या राहत्या घरी मिळून आला आहे.त्यांना पोलीस अधिकारी यांनी कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांना आगामी १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात चोरांनी आपला उपद्रव वाढवला आहे.कोरोना काळात रिकाम्या हातांना काम न राहिल्याने अनेकांना हा व्यवसाय सोयीचा वाटत असल्याचे या घटनांवरून तरी वाटत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात गोधेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून फिर्यादी अशोक मारुती रांधवणे हे आपल्या गोधेगाव शिवारात कासली रोडलगत राहतात.दि.११ मार्च रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ते आपल्या कुटुंबासोबत फराळ करत असताना त्या ठिकाणी घरात प्रवेश करून काही अज्ञात आरोपी आले व त्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना.”माल बतावो,”माल निकालो” अशा तोडक्या मोडक्या हिंदी भाषेचा वापर करत फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले व अल्पावधीतच पोबारा केला होता.या गंभीर बाबीचा फिर्यादी अशोक रांधवणे यांनी रीतसर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तातडीने हालचाल केली असता त्यांनी संशयित गोधेगाव शिवारात शोध मोहीम राबविली असता त्यांना एक इसम गोधेगाव शिवारात रस्त्यालगत लपून बसलेला आढळला फिर्यादी यांनी वर्णन केल्या प्रमाणे त्याच्या अंगात फुल बाह्यांचा पिवळा “टी” शर्ट असल्याने पोलिसांचा संशय बळावला त्यांनी त्यास ताब्यात घेतले असता व त्याला आपला खाक्या दाखवला असता “तो” पोपटा प्रमाणे बोलू लागला व त्याने अन्य टाकळी लिफ्ट जवळ ता .कोपरगाव येथील आरोपी ऋषिकेश शंकर पैठणकर,राजेंद्र लक्ष्मण जाधव (वय-२४) आदींना शोध मोहीम सुरु करून रात्रीच ताब्यात घेतले आहे.ऋषीकेश पैठणकर याच्या ताब्यात अंगझडतीत साठ हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र मिळून आले आहे.तर राजेंद्र लक्ष्मण जाधव हाही त्याच्या राहत्या घरी मिळून आला आहे.त्यांना पोलीस अधिकारी यांनी कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांना आगामी १५ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.त्यांनी अन्यत्र किती गुन्हे केले याचा शोध पोलीस करत आहेत.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळॆ,पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के पो.कॉ.अंबादास वाघ,जयदीप गवारे आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.त्यांच्या या कारवाईचे तालुक्यातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close