जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोरीचा प्रयत्न,कोपरगावात एका चोरट्यास अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे गस्तीस असलेल्या पथकाने संशियत रित्या फिरत असलेल्या खाटीक गल्लीतील मौसीन पठाण या चोरट्यास पकडले असून त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याने कोपरगाव शहर पोलीसांचे शहरात कौतुक होत आहे.त्यामुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे.

कोपरगाव शहरात वाहन चोऱ्यासह आणि भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढीले आहे.त्यात वकील,लेखा परीक्षक,डॉक्टरही सुटले नाही हे विशेष ! नुकतीच कोपरगाव बेत येथील इसमांच्या स्कुटीच्या डिकीतून ७.५० लाखांची चोरी झाली आहे.त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात गस्ती पथके कार्यरत केली असल्याचे दिसत आहेत.दि.०६ मे रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जेऊर पाटोदा शिवारात श्रीकृष्ण मंदिराचे पाठीमागे एक इसम संशयित रित्या फिरताना आढळला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास अटक केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात अलीकडील काळात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असल्याचे आढळून येत आहे.त्यामुळे नगर स्थानिक गुन्हे शाखेची या शहर आणि परिसरात वक्रदृष्टी झाली असून पूर्वी या शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त खबरीनुसार कोपरगाव शहर हद्दीत दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी केलेल्या कारवाईत तीन आरोपी व गुटख्याच्या दोन गाड्या जप्त केल्या होत्या.यातील २.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.त्यात एक मारुती ओमनी गाडी व मारुती वॅगणार अशांचा समावेश होता.चारचाकी,दुचाकी वाहन चोऱ्या आणि भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण तर वाढीला आळाच बसताना दिसत नाही.त्यात वकील,लेखा परीक्षक,डॉक्टरही सुटले नाही हे विशेष ! नुकतीच कोपरगाव बेत येथील इसमांच्या स्कुटीच्या डिकीतून ७.५० लाखांची चोरी झाली आहे.तर अन्य भुरट्या चोऱ्या लक्षणीयरित्या वाढलेल्या आहेत.त्यामुळे पोलीस सतर्क झाले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात गस्ती पथके कार्यरत केली असल्याचे दिसत आहेत.दि.०६ मे रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जेऊर पाटोदा शिवारात श्रीकृष्ण मंदिराचे पाठीमागे एक इसम संशयित रित्या फिरताना आढळला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव मौसीन मुक्तार पठाण (वय-२६) रा.खाटीक गल्ली कोपरगाव असे सांगितले आहे.त्याच्याकडून एक स्क्रू ड्रायव्हर ताब्यात घेतला आहे.

दरम्यान त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर फिर्यादी पो.कॉ.संभाजी भीमराव शिंदे (वय-३५) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२१७/२०२३ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मर्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.के.ए.जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close