जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा विनयभंग,कोपरगावात पाच जणाविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शहर पोलीस ठाण्याचा हद्दीत रहिवासी असलेल्या महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून तिला आरोपी महिलेच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबध असल्याच्या कारणारून काठीने लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आरोपी सोमनाथ पावसे,रवी पावसे,ज्योती पावसे,आदी पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असून तिचे आरोपी महिलेच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे.त्या संशयावरून आरोपी सोमनाथ पावसे,रवी पावसे,ज्योती पावसे,रा.हिवरगाव ता.संगमनेर सह पाच आरोपीनी काल दुपारी फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन एका आरोपी महिलेच्या नवऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून काठी व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले असून शिवीगाळ करून करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असून तिचे आरोपी महिलेच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे.त्या संशयावरून आरोपी सोमनाथ पावसे,रवी पावसे,ज्योती पावसे,रा.हिवरगाव ता.संगमनेर,नीलिमा लोहकणे,वैष्णवी लोहकणे रा.कोकमठाण आदी पाच आरोपीनी शनिवार दि.१३ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन एका आरोपी महिलेच्या नवऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून काठी व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले असून शिवीगाळ करून करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.तर सोमनाथ पावसे याने फिर्यादी महिलेच्या अंगावरील साडी सोडून फिर्यादी सोबत अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मध्य रात्री उशिरा धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२३१/२०२३ भा.द.वि.कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ अन्वये पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close