जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

..त्या डाक कर्मचाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील रहिवाशी असलेल्या तीन महिलांच्या नावावरील पोष्टात टाकलेली ४० हजार २०० रुपयांची रक्कम परस्पर बनावट सह्या करून हडप केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला बोलकी येथील आरोपी डाक कर्मचारी रवींद्र बाळासाहेब जाधव यास आज कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए. शेख यांचे समोर पोलिसानी हजर केले असता त्यास दि.२५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील अड्.एस.ए.व्यवहारे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

तक्रारदार महिलांचा अपहार करणारा आरोपी डाक कर्मचारी रवींद्र जाधव यास आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए. शेख यांचे समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण आरोपी जाधव यास दि.२५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीस सरकारी वकील अड्.एस.ए. व्यवहारे यांनी माहिती दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,धारणगाव येथील महिलां लताबाई विष्णू चौधरी,मीराबाई निवृत्ती कदम,व विठाबाई सीताराम आभाळे तिन्ही रा.धारणगाव यांनी आपली अल्पबचत करण्यासाठी डाक कार्यालयात आपली नियमित ठेव ठेवली होती.आरोपी डाक कर्मचारी रवींद्र जाधव याची या ठेवींवर वाकडी नजर होती.त्याने याबाबत बनावट नोंदी करून खातेदारांचे नावावरून परस्पर पैसे काढून ते सरकारी खात्यात जमा न करता ते आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरले होते.हि बाब पोष्ट खात्यातील निरीक्षक व फिर्यादी विनायक शिंदे यांच्या लक्षात आली होती.त्यांनी याबाबत या महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.त्यामुळे दि.२१ डिसेंबर रोजी याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात काल आरोपी रवींद्र जाधव याचे विरुद्ध गुन्हा क्रं,५५८/२०२० भा.द.वि.कलम ४२०,४०९,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.तक्रारदार महिलांचा अपहार करणारा आरोपी डाक कर्मचारी रवींद्र जाधव यास आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.ए. शेख यांचे समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण आरोपी जाधव यास दि.२५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीस सरकारी वकील अड्.एस.ए. व्यवहारे यांनी माहिती दिली आहे.याघटनेचा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close