गुन्हे विषयक
..त्या लुटीतील दरोडेखोरांना चार दिवसांची पोलीस कोठडी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात ११ डिसेंबरच्या रात्री १०.२५ सुमारास व्यावसायिक दिलीप शंकर गौड (वय-३५) यांना या दोन गाड्यावरून आलेल्या चार लुटारूनी धारदार चाकूचा धाक दाखवून ४ लाख ९८ हजार ९०० रुपयांची लुट केल्याच्या गुंह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यानी जेरबंद केले असून त्यातील गणेश चव्हाण,राहुल गोडगे,रवींद्र तुपे,यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले असून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना यश मिळाले आहे.तर सिद्धार्थ तुपे,अनिल कांबळे,सागर तांदळे आदी गुन्हेगार फरार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.पांचाळ यांचेपुढे हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे.
त्या लुटीतील अटक चार आरोपींना नुकतेच कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री पांचाळ यांचेपुढे हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या आरोपींना दि.२४ डिसेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील एस.ए. व्यवहारे यांनी दिली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरक्षक यांच्या बदलीनंतर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी उचल खाल्ली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.कोपरगावात पोलीस निरीक्षक खंबीर असल्याशिवाय गुन्हेगारी नियंत्रणात राहात नाही.त्याचा उत्तम नमुना काही दिवसापूर्वी उघड झाला आहे.अकरा डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील मद्य व्यापारी आपले दुकान बंद करून निघाले असता भाई-भाई मोटार गॅरेज समोर होंडा शाईन व बजाज पल्सर या दोन दुचाकी वरून आलेल्या व पाळत ठेऊन असलेल्या अज्ञात चार चोरट्यानी त्याना लोखंडी धारदार चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे ०४ लाख ९८ हजार ९०० रुपये रोख रक्कम,टॅब,सॅमसंग कंपनीचे २ अँनड्राईड फोन तसेच कागदपत्रे असा ऐवज लंपास केला होता.या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.चोरट्यानी पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण केले होते.दरम्यान या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्त करण्यात आला होता.या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी आरोपींविरुद्ध जोरदार मोहीम सुरु करून त्यांना जेरबंद करण्याचा विडा उचलला होता.व त्यादिशेने पाऊलं उचलले होते.त्याचा सुगावा त्यांना मिळाल्यावर त्यांनी प्रथम यातील शिर्डी येथील प्रमुख आरोपी सोमनाथ गोपाळे यांचेवर लक्ष केंद्रित केले होते.गोपाळे व त्याच्या साथीदारांनी मिळून हे धाडस केल्याचा सुगावा गुप्त खबऱ्याकडून मिळाला होता.त्यांनी त्यासाठी आपले साथीदार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरिषकुमार देशमुख,पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे,सहाय्यक फौजदार मोहन गाजरे,आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने शिर्डी येथे सापळा लावून मुख्य आरोपी सोमनाथ गोपाळे याच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्याला पोलीस हिसका दाखवला असता तो पोपटासारखा बोलू लागला होता.त्या चौकशीत अन्य आरोपी निष्पन्न झाले होते.त्यानां विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान आरोपी सिद्धार्थ तुपे,अनिल कांबळे,सागर तांदळे आदी आरोपी फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेता आहे.ताब्यात घेतलेल्या चार आरोपीकडून रोख रक्कम रुपये ८६ हजार ५०० रुपये पोलिसानी जप्त केले आहे.त्यांना नुकतेच कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री पांचाळ यांचेपुढे हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या आरोपींना दि.२४ डिसेंबर पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील एस.ए. व्यवहारे यांनी दिली आहे.या आरोपींकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली होती.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.