गुन्हे विषयक
…या शहरात रोख रकमेसह मोठी चोरी,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीराम पार्क परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेत १ लाख ५० हजार रुपयांची रोकड,२५ हजार रुपये किमतीचे 09 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे आणि ५ हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती चोरीला गेली असल्याची माहिती हाती आली आहे.त्याला पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी कार्तिक मेघराज दारुंटे यांचे घरातून दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता.चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यामधील १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम,09 ग्रॅम वजनाचे सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे आणि ५०० रुपये किमतीची चांदीची मूर्ती,असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्या काही नव्या नाही.कोपरगाव शहरात आणि परिसरात गेल्या काही महिन्यांत चोऱ्या,घरफोड्या आणि लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून ही परिस्थिती खरोखरच अत्यंत चिंताजनक बनली आहे.भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणे,बंद घरे आणि दुकाने फोडणे,तसेच समृद्धी महामार्ग व ग्रामीण भागात हत्यारांचा धाक दाखवून दरोडे टाकण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.अशीच एक घटना नुकतीच श्रीराम पार्क येथे उघडकीस आली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी कार्तिक मेघराज दारुंटे हे श्रीराम पार्क,कोपरगाव येथील रहिवासी आहेत.यांच्या घरात दि.२४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता.चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यामधील १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम,09 ग्रॅम वजनाचे सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे आणि ५०० रुपये किमतीची चांदीची मूर्ती,असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.या घटनेमुळे श्रीराम पार्क परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.श्वान पथकाला पाचारण करून श्वानाच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.परिसराची पाहणी करत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे पुढील तपास करीत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवत श्वान पथकाच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहे.
दरम्यान,बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाताना अधिक काळजी घ्यावी,तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी,असे आवाहन पोलिस अधिकारी उद्धव डमाळे यांनी केले आहे.



