जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध वाळू उपशासह दोन गुन्हे दाखल !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
  कोपरगाव तालुक्यातील वाळूचोरानी नदी पात्रात हैदोस घातला असून वाळूला मिळणारे सोन्याचे मोल त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने वाळू उपसा थांबायचे नाव घेतानाही परिणामी वाळूचोरी सुरूच असून कोपरगाव तालुका पोलिसांनी नुकतीच गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून गणेश नाईकवाडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला असल्याचे दिसून आले आहे.तर दुसऱ्या गुन्ह्यात शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत हॉटेल स्वस्तिक जवळ इंडियन ऑईल पेट्रोल पंपजावळ उभ्या असलेल्या टाटा हायवा या गाडीची सुमारे 08 हजार रुपये किमतीची बॅटरी दर्शन चंद्रकांत इस्ते याने चोरून नेली असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

धारणगाव येथील वाळूचोरीतील ट्रॅक्टर,ट्रॉली तालुका पोलिसांनी जप्त केली त्याचे छायाचित्र.

दरम्यान आणखी एक घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत उघडकीस आली असून यातील आरोपी दर्शन चंद्रकांत इस्ते रा.तीन चारी,कोकमठाण याने त्याच हद्दीतील फिर्यादी विकास अशोक चिंतामणी (वय -29) यांचे मालकीच्या टाटा हायवा (दहा टायर) या गाडीची 08 हजार रुपये किंमतीची कारजोन कंपनीची लाल रंगाचबॅटरी ही दि.08 ऑगस्ट रोजीचे दुपारी 02 वाजण्याचे दरम्यान स्वस्तीक हॉटेलजवळ असलेल्या इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाजवळुन स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली असल्याचे उघड झाले आहे.

   गोदावरी नदीच्या पात्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा अत्यंत चिंताजनक बनला आहे.यामुळे नदीचे पात्र पोखरले जात असून,जलचर आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. राज्याचे जलस्रोत,पर्यावरण आणि नदीकाठच्या परिसरासाठी ही एक गंभीर समस्या बनली आहे.पर्यावरणावर होणारा दुष्परिणामनदीपात्र खोल झाल्याने पाण्याची साठवणूक आणि प्रवाहावर वाईट परिणाम होतो.भूगर्भाची जलपातळी वेगाने खाली जात आहे.नदीकाठची जमीन खचून धूप होण्याचा धोका वाढत चालला आहे.जलचर प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नैसर्गिक जीवन उद्ध्वस्त होते.प्रशासकीय कारवाई आणि आव्हानेपोलीस आणि महसूल विभागाने वेळोवेळी छापे टाकून काही वाहने व बॉटी जप्त केल्या आहेत.वाळू माफियांकडून यंत्रसामग्रीचा वापर करून अनधिकृतपणे उपसा सुरूच असतो.स्थानिक स्तरावर कठोर कायदे व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.याबाबत अशीच घटना नुकतीच उघड झाली आहे.

    यातील घटनेत पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,धारणगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातुन अवैधरित्या वाळु तस्करी सुरु आहे.बातमी मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकासह धारणगाव शिवारात जाऊन शोध मोहीम सुरु केली होती.त्या कारवाईत त्यांना गणेश नाईकवाडे राधारणगाव ता.कोपरगाव हा त्याचेकडील विना नंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये गोदावरी नदीपात्रातुन शासकीय वाळुची चोरी करुन घेऊन जात असताना गोदावरी नदीचे अलीकडे धारणगाव शिवारात मिळुन आला होता.मात्र या कारवाईचा सुगावा त्याला लागताच व पोलीस आल्याचे पाहुन तो ट्रॅक्टर ट्रॉली सोडुन तो काटवनात पायवाटेने पळुन गेला आहे.त्याचा पोलीसांनी पाठलाग केला असता तो झाडाझुडपांचा आडोश्याचा फायदा घेऊन पसार झाला आहे.त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉली त्यामध्ये एक ब्रास शासकीय वाळु असलेली पोलीसांनी जप्त केली केली आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 335/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कायदा कलम ३०३ (२) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पो.ना.कारखेले,पो.कॉ.राम खारतोडे,चालक पो.कॉ.फाळके,पो.कों.रशीद शेख यांचे पथकाने केली आहे.त्यांचे कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

   दरम्यान आणखी एक घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत उघडकीस आली असून यातील आरोपी दर्शन चंद्रकांत इस्ते रा.तीन चारी,कोकमठाण याने त्याच हद्दीतील फिर्यादी विकास अशोक चिंतामणी (वय -29) यांचे मालकीच्या टाटा हायवा (दहा टायर) या गाडीची 08 हजार रुपये किंमतीची कारजोन कंपनीची लाल रंगाचबॅटरी ही दि.08 ऑगस्ट रोजीचे दुपारी 02 वाजण्याचे दरम्यान स्वस्तीक हॉटेलजवळ असलेल्या इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाजवळुन स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे परिसरात वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्याचे विरुद्ध कोपरगाव सशहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र.434/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कायदा कलम 303(2) नुसार गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल के.ए.जाधव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close