गुन्हे विषयक
अखेर…’त्या’ महिलेच्या मृत्यूबाबत गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत दि.06 ऑगस्ट रोजी मृत्यू झालेली महिला वैशाली किरण रानोडे हिच्या मृत्यू प्रकरणी काल उशिरा कोपरगाव शहर पोलिसांनी तिच्या पती किरण बाळासाहेब रानोडे याचे विरुद्ध उपचारात हयगय केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.सदर महिलेवर रात्री उशिरा 8.45 वाजता पढेगाव हद्दीत शोकाकुल वातावरणात व पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

दरम्यान याबाबत फिर्यादी दिपक प्रकाश शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरून बोलताना सांगितलेल्या कथानकात आणि पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात विसंगती आढळल्याने याबाबत संवत्सर आणि पढेगाव परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबतचे स्वाविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मयत महिला वैशाली रानोडे हिला रात्री 10.30 वाजता अज्ञात कारणाने त्याचा पती किरण बाळासाहेब रानोडे याने त्या महिलेची सासू आणि सासरा आदींनी ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे माहिती असतानाही तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप केला तिच्या चुलतभावाने केला होता.त्यात तिचा तिच्या बेडवरच मोठा रक्तस्राव झाला असताना त्याकडे तिचा नवरा,सासू,सासरा आदींनी दुर्लक्ष केले होते.त्याबाबत तिच्या या घटनेची माहिती नजीकच्या काही हितचिंतकांनी तिच्या माहेरी पढेगाव येथे दूरध्वनीवरून कळवली होती.त्यांनी संवत्सर येथे वस्तीवर धाव घेऊन तिला तातडीने आधी कोपरगाव येथे आणि नंतर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.त्यात तिचा काल पहाटे 04 च्या सुमारास निधन झाले असल्याचे म्हटले होते.
दरम्यान याबाबत तिचा पढेगाव येथील रहिवासी असलेला चुलत भाऊ दिपक प्रकाश शिंदे (वय -37) रात्री कोपरगाव शहर पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”संवत्सर हद्दीत लक्ष्मणवाडी येथील आपली चुलत बहिणीला दिनांक 05 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता तिचा पती तिला बाहेर येऊ देत नव्हता.माहेरील माणसाबरोबर बोलू देत नव्हता.वरील तारखेस व वेळी मयत महिला ही गरोदर असताना तिला पोटात त्रास होऊ लागला होता.परिणामी जास्त रक्तस्राव होऊन देखील नवरा किरण रानोडे याने निष्काळजी पणा करत तिला वेळेत दवाखान्यात नेले नाही.त्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी तिला प्रवरा हॉस्पिटल येथे उपचारार्थ घेऊन गेले होते.औषधोपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान या प्रकरणी अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे रात्री 01 वाजता तर शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी पहाटे 01 वाजता तर कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे,पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे आदींनी भेट दिली असून घटनेचे गांभीर्य जाणून घेतले आहे.
या प्रकरणी काल रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र.429/2026 भारतीय न्याय संहिता कायदा-2023 चे कलम 106,(1),85 प्रमाणे आरोपी विरुद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत.
दरम्यान याबाबत फिर्यादी दिपक प्रकाश शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवरून बोलताना सांगितलेल्या कथानकात आणि पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात विसंगती आढळल्याने याबाबत संवत्सर आणि पढेगाव परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.



