गुन्हे विषयक
एका तरुणाचा मृत्यू,अकस्मात मृत्यूची नोंद!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
मूळ उत्तरप्रदेशातील रहिवासी आणि कोपरगाव शहरातील कोपरे कॉलनीतील तात्पुरता रहिवासी असलेल्या २२ वर्षीय मजूर तरुणाचा अकस्मात मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्याला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात स्थानिक मजुरांचा तुटवडा असल्याने बिहार,उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात मजूर,कुशल कारागीर यांचा राबता असतो.हे मजूर वर्षानुवर्षे राज्यातील कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात राहून रोजी रोटीचा व्यवसाय करतात.त्यांचे आपल्या घराकडे बऱ्याच वेळा जाणे होत नाही.त्यातच काहींचा आजाराने तर काहींचा अपघाताने मृत्यू होत असतो.अशीच घटना कोपरगाव शहरातील कोपरे कॉलनीत नुकतीच घडली आहे.
कोपरगावसह राज्यातील विविध भागात परप्रांतीय मजुरांचा मोठा भरणा असल्याचे दिसून येत आहे.स्थानिक मजुरांचा तुटवडा असल्याने बिहार,उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यात मजूर,कुशल कारागीर यांचा राबता असतो.हे मजूर वर्षानुवर्षे राज्यातील कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात राहून रोजी रोटीचा व्यवसाय करतात.त्यांचे आपल्या घराकडे बऱ्याच वेळा जाणे होत नाही.त्यातच काहींचा आजाराने तर काहींचा अपघाताने मृत्यू होत असतो.अशीच घटना कोपरगाव शहरातील कोपरे कॉलनीत नुकतीच घडली आहे.यातील मयत तरुण जितेंद्र गोबींद राजभर (वय-२२)वर्षे रा.चकरदेवा,ता.मोहमदाबाद,पोस्टे,राणीपुर,जिल्हा-महु,राज्य उत्तरप्रदेश ह.मु.अरूण शेळके यांचे घरी कोपरे कॉलनी कोपरगाव येथे तात्पुरता निवास करून राहत होता.मात्र ३१ जुलै रोजी सकाळी ०९ वाजेपूर्वी कधीतरी तो अज्ञात कारणाने मृत झाला आहे.ही बाब शेजारी नागरिकांच्या सकाळी लक्षात आल्यावर त्यांनी कोपरगाव शहर पोलिसांना कळवली आहे.त्यानंतर कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे,पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय उंबरकर यांनी खबर दिली आहे.शहर पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ५३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक निरीक्षक उध्दव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल डी.एन. भांगरे हे करीत आहे.



