जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

भोंदू खरातचा…या शहरातील दोघांना फटका !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कहाण्डळवाडी येथील मूळ रहिवासी असलेला अशोक खरात या महाठगाच्या काळ्या कर्तृत्वाची व्याप्ती दिवसेंदिवस चंद्रकोरी प्रमाणे वाढत चालली असून यामध्ये आता स्थानिक,आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिक आणि पुढारी गुंतले असल्याचे उघड होत आहे.त्यात कोपरगाव शहरातील रहिवासी आणि राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या पदाचा बळी गेला असल्याचे बोलले जात असताना आज कोपरगाव शहरातील रहिवासी असलेले हॉटेल व्यावसायिक निलेश जपे यांच्या घरी ईडीने धाड टाकली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील दोघांना याचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान आज कोपरगाव आणि आसपासच्या परिसरात ईडीची (अंमलबजावणी संचालनालय) कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध आहे.एका कंपनीशी संबंधित संचालकांच्या व्यावसायिक आणि निवासी जागेवर छापे टाकले आहेत.ही कारवाई कोपरगाव,नाशिक आणि ठाणे या ठिकाणी करण्यात आली आहे.त्यातील शिर्डी येथील एक हॉटेल व्यावसायिक निलेश जपे यांचे नाव समोर आले आहे.

   अशोक खरात याने केलेले महिलांचे लैंगिक शोषण,भोंदुगिरी व्यवहार आणि अशा गंभीर गंभीर पालकांनी गैरसोयीच्या भोवऱ्यात अडकलेल्या भागाने आता नवे वळण घेतले आहे.राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.गेल्या अनेक दिवस ते या पदावर कार्यरत होते.त्यांनी या संघटनेचे मोठे नाव केले होते.शिवाय या संस्थेला राज्य आणि देश पातळीवर नाव मिळवून दिले होते.तिच्यावर त्यांची चांगली पकड निर्माण झाली होती.मात्र,अशोक खरात आणि समता पतसंस्थेतील कथित संबंध उघडकीस आल्यानंतर सभासदांमध्ये त्यांच्याविरोधात असंतोष वाढला होता.परिणामी त्यांच्यावर राज्यातून दबावा वाढला होता परिणामी त्यांनी आज आपला राजीनामा दिला असल्याची माहिती हाती आली आहे.यापूर्वीच कोयटे यांनी आपण “आपण अशोक खरातचा भक्त नाही आणि कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही.केवळ आपण एका कार्यक्रमात त्याची आणि आपली भेट झाली होती.एवढ्यापुरता त्याचा संबंध होता.मात्र कोणी आपली आणि संस्थेची बदनामी करत असेल तर आपले वकील त्यांचे विरुद्ध बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करतील अशी अप्रत्यक्ष माध्यम प्रतिनिधींना धमकी दिली होती.मात्र राहाता तालुक्यातील समता पतसंस्थेत त्याचे खाते आणि त्याने अनेक बोगस कागदपत्रांवर उघडलेले खाते यावर अनेक माध्यमात टीका झाली होती.संबंधित पतसंस्थांतील खात्यात झालेल्या व्यवहाराची चौकशी झाली होती.त्यानंतर वारंवार बातम्या येत असल्याचे त्यांचेवर दबाव वाढला होता असे मानले जात आहे.मात्र त्याचा यांनी इन्कार केला असून आपण वयाची पंचाहत्तरी ओलांडली असल्याने व राज्य आणि देशभर फिरणे अवघड झाल्याने आपला राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचेशी उशिरा संपर्क साधला असता त्यांनी आपण वयाची पंचाहत्तरी ओलांडली असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.तर निलेश जपे यांचेबाबत मात्र दूरचित्रवाणी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात बातम्या सुरू होत्या.मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही.

  राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत सुमारे पंधरा हजार पतसंस्था कार्यरत असून हजारो सभासद किंवा जनता जोडलेले आहेत.2015 पूर्वीपासून अध्यक्षपद भूषवलेले कोयटे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता अशी माहिती हाती आली आहे.खरात याचे अनेक व्यवहार संशयास्पद होते.दरम्यान अशोक खरात हा समता पतसंस्थेतील सुमारे 100 खात्यांचा नॉमिनी असल्याचे दिसून आले होते.

  दरम्यान आज कोपरगाव आणि आसपासच्या परिसरात ईडीची (अंमलबजावणी संचालनालय) कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध आहे.एका कंपनीशी संबंधित संचालकांच्या व्यावसायिक आणि निवासी जागेवर छापे टाकले आहेत.ही कारवाई कोपरगाव,नाशिक आणि ठाणे या ठिकाणी करण्यात आली आहे.त्यातील शिर्डी येथील एक हॉटेल व्यावसायिक निलेश जपे यांचे नाव समोर आले आहे.मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याने स्थानिक कोपरगाव शहर पोलिसांना कोणतीही माहिती असल्याचे दिसून आले नाही.त्यामुळे त्याला दुजोरा मिळाला नाही.मात्र दूरचित्रवाणी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात बातम्या सुरू होत्या.दरम्यान निलेश जपे एक धार्मिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.त्यांच्या तिरुपती येथील शिस्तबद्ध आय.एस.आय.मार्क मिळवलेली दिंडी नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.त्यांच्याबद्दल कोपरगाव आणि शिर्डी शहरात मोठी सहानुभूती असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे ते या प्रकरणात समाविष्ट असल्याची शक्यता नसल्याचा अनेकांचा अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close