गुन्हे विषयक
लाच लुचपत विभागाची धाड,कोपरगावात महिला अटक ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हैराण करून सोडत असल्याचे दिसून येत आहे.त्यातून अनेक घटना उघडकीस येत असून आजच काही वेळापूर्वी तहसील कार्यालयात पवार नामक एक महसूल सहाय्यक महिला सुमारे पाच (!)हजारांची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाने पकडली असून तिला अटक केली असून कारवाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाच्या निरीक्षक छाया देवरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.मात्र सदर महिलांवर कारवाई सुरू असल्याचे गुन्हा दाखल व्हायला अजून तीन साडेतीन तास वेळ लागणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
एकीकडे देशभर भ्रष्टाचारविरोधी वातावरण पसरले असताना सरकारी खात्यांतील भ्रष्टाचाराची गंगा मात्र खळाळून वाहत असताना दिसत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या एकूण कारवायांचा तपशील पाहता गेल्या काही महिन्यांत महसूल खात्याने पोलिस खात्याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला असल्याचे वारंवार उघड झाले आहे.त्यातच महसुल महत्त्वाच्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी यापुढे ‘भ्रष्टाचार बंद’ असे खणखणीत धोरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील वर्षात फेब्रुवारीत जाहीर केले होते मात्र महसूल मंत्र्यांची हि घोषणा कोपरगाव तहसील विभागाने कचरा कुंडीत टाकून दिली असल्याचे उघड झाले आहे.त्यातच कोपरगाव तालुक्यातील तहसील तथा महसूल कार्यालय हे भ्रष्टाचाराचे आगार मानले जाते.मागील वर्षी उन्हाळ्यात वाढलेल्या भ्रष्टाचारावरून मोठा गाजावाजा झाल्यावर आ.काळे यांनी जनता दरबार आयोजित करण्यास प्रारंभ केला होता.मागील आठवड्यात गौतमनगर येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत आ.काळे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची यावरून कानउघडणी केली होती.त्या बातम्यांची अद्याप शाई वाळलेली नसताना ही घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान याबाबत कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी,”आपण एका पाहुण्याच्या लग्नासाठी बाहेर आहे मात्र या कारवाईबाबत आपल्या माहिती मिळाली आहे.त्यात ए.बी.पवार नामक महिला कर्मचाऱ्यावर कारवाई झाली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.
दरम्यान या पूर्वी त्यांच्या पहिल्या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारींचा महापूर आला होता.त्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेऊन या प्रश्नही अधिकाऱ्यांना वारंवार तंबी देऊनही काही फरक पडला असे म्हणणे धाडसाचे ठरेल अशी वर्तमान स्थिती आहे.मागील महिन्यात त्यांनी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचे गाऱ्हाणे केले होते.पुढे यांचे मागील आठवड्यात निधन झाले आहे.चार वर्षापूर्वी येथील बोरुडे नामक तहसीलदारच वाळूची लाच घेताना रंगेहाट पकडले गेले होते.त्याआधी नाटेगाव,येसगाव,महिला तलाठी,अव्वल कारकून अटक झाले आहे.म्हणजे याआधीच जवळपास अर्धा डझन अधिकारी आणि कर्मचारी लाच लुचपत विभागाने अटक करूनही भ्रष्टाचाराची गंगा कमी होताना दिसत नाही.त्यामुळे नागरिकांना आपली सरकारी कामे करताना किती अडचणींचा सामना करावा लागतो याचा अंदाज सहज कोणालाही येईल.अशीच घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोपरगाव तहसील कचेरीत घडली असल्याचे उघड झाले आहे.यातील अटक महिला ही मूळ साक्री (जिल्हा धुळे) येथील असल्याचे समजत आहे.तर सदर महिला अडीच वर्षापूर्वी संगमनेर येथून कोपरगाव येथील तहसील कार्यालयात बदलून आलेली आहे.मात्र या महिलेचा कामाचा लौकिक तसा बरा या व्याख्येत मोडणारा मुळीच नव्हता.नागरिकांना त्या महिलेच्या कामाचा कायमच तडाखा बसत असताना नागरिक कुजबुजत होते.मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची असा फक्त विषय बाकी होता.आज एका तक्रारदाराने तेही काम इमाने इतबारे केले असल्याचे उघड झाले आहे.तक्रारदार इसमच काम होत नसल्याने त्याने वारंवार खेटा घालूनही उपयोग न झाल्याने त्याने संतापून नगर येथील लाच लुचपत विभागाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता.त्यातून हे भ्रष्टाचार कांड उघड झाले असल्याचे समजत आहे.
दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाच्या निरीक्षक छाया देवरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.मात्र सदर महिलांवर कारवाई सुरू असल्याचे गुन्हा दाखल व्हायला अजून तीन साडेतीन तास वेळ लागणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
दरम्यान याबाबत कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी,”आपण एका पाहुण्याच्या लग्नासाठी बाहेर आहे मात्र या कारवाईबाबत आपल्या माहिती मिळाली आहे.त्यात ए.बी.पवार नामक महिला कर्मचाऱ्यावर कारवाई झाली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.



