जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकीची आत्महत्या,उलट सुलट चर्चा !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत काल सायंकाळी 8.15 वाजेच्या सुमारास राघवेश्वर मंदिराजवळ गोदावरी नदी पात्रात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे.पोलिसांनी तिला पाण्यातून वर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.त्यामुळे ही आत्महत्या की हत्या अशी परिसरात चर्चा सुरू झाली आहे.मयत मुलीचे नाव अश्विनी शेजवळ (वय-17) असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सर्व छायाचित्रे संकल्पित.

  

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने गावातील ग्रामस्थांकडून कानोसा घेतला असता सदर मुलगी आणि नजीकच्या गावातील एक तरुण यांचे सूत जुळले असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्यांच्या विवाहास घरच्या नातेवाईकांचा विरोध असल्याने झालेल्या प्रेमभंगातून तिने आत्महत्या केली असावी असा कयास व्यक्त होत आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कुंभारी येथील एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असल्याची नोंद कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.पोलिसांनी तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती.त्यामुळे तिचे पालक,नातेवाईक,ग्रामस्थ चिंतेत पडले होते.त्यामुळे त्यांनी तिची हरवल्याची नोंद कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात केली होती.पोलिसांनी तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नव्हती.त्यामुळे तिचा अद्याप गेली पाच दिवस पोलिसांनी तिचा अग्निशामक पथकाचे सहाय्याने गोदावरी नदीच्या पाण्यात तिचा शोध उरू ठेवला होता.मात्र काल सायंकाळच्या 6.30 च्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचारी शंकर चंदनशिव हा ग्रामपंचायतीची मोटार सुरू करण्यात गोदावरी पुलाजवळ गेला असता त्याला त्या ठिकाणी एक प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले होते.एका मुलीचा मृतदेह गोदावरी नदीच्या पाण्यावर राघवेश्वर मंदिराच्या जवळ तरंगत असल्याची माहिती त्याने हिंगणी गावचे प्रभारी पोलिस पाटील सोहम पवार यांना व त्यानंतर पोलिस पाटील यांनी ती माहिती तालुका पोलिसांना दिली होती.त्यानुसार त्याची बातमीची खबर हिंगणी येथील प्रभारी पोलिस पाटील यांनी पोलिसांना कळवली होती.त्यानुसार पाण्यावर तरंगणारा मृतदेह तातडीने अमित खोकले यांचे रुग्णाहिनीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता.येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले आहे.

  

दरम्यान सदर मुलगी ही सोमवार दि.26 जानेवारी राजी पहाटे 02 वाजता घरातून बेपता झाली होती.तिने अंगावर ब्लँकेट घेऊन पायात चप्पल घालून प्रवास करून कोणाच्या नजरेस येणार नाही याची काळजी घेऊन ही आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.तिच्या पाण्यात उडी मारण्याचा आवाज नजीक राहणाऱ्या काही आदिवासींनी ऐकला होता.मात्र मध्यरात्री त्यांना त्या आवाजानंतर काही संशयास्पद दिसले नव्हते त्यामुळे त्यांनी रात्री घटनास्थळी जाण्याचे धाडस दाखवले नाही.

   दरम्यान एका माहितीनुसार सदर मुलगी ही सोमवार दि.26 जानेवारी राजी पहाटे 02 वाजता घरातून बेपता झाली होती.तिने अंगावर ब्लँकेट घेऊन पायात चप्पल घालून प्रवास करून कोणाच्या नजरेस येणार नाही याची काळजी घेऊन ही आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.तिच्या पाण्यात उडी मारण्याचा आवाज नजीक राहणाऱ्या काही आदिवासींनी ऐकला होता.मात्र मध्यरात्री त्यांना त्या आवाजानंतर काही संशयास्पद दिसले नव्हते त्यामुळे त्यांनी एवढ्या रात्री धाडस केले नाही.

   दरम्यान तिच्या शवाजवळ त्या संशयित गोष्टी आढळून आल्या आहेत.आदल्या दिवशी तिचे मोबाईलवर सुरू असलेले चॅटिंग नजीकच्या नातेवाईकांनी पहिले होते.व तिला तंबी भरून तिची रवानगी कोपरगाव येथील तिच्या ज्येष्ठ विवाहित बहीण आणि मेहुण्याकडे केली होती.मात्र त्या ठिकाणी तिने जेवण करण्याचे टाळले होते.शिवाय तिची अस्वस्थता त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती त्यामुळे त्यांनी तिला पुन्हा तिच्या पालकांकडे पाठवून दिले होते.त्यानंतर रात्री एक वाजेचा नंतर तिने सर्वांची नजर चुकवून ही आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
  
   दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे सह पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींनी भेट दिली आहे.मृत मुलीच्या पश्चात आई,वडील,दोन बहिणी,एक भाऊ असा परिवार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  दरम्यान याप्रकरणी तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्र.9/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करत आहेत.

   दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने गावातील ग्रामस्थांकडून कानोसा घेतला असता सदर मुलगी आणि नजीकच्या गावातील एक तरुण यांचे सूत जुळले असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र त्यांच्या विवाहास घरच्या नातेवाईकांचा विरोध असल्याने झालेल्या प्रेमभंगातून तिने आत्महत्या केली असावी असा कयास व्यक्त होत आहे.गेले पाच दिवस सदर प्रेत पाण्यात राहिल्याने त्याची दुर्गंधी सुटली होती अशी माहिती हाती आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close