गुन्हे विषयक
मारहाणीमुळेच…’तो’ मृत्यू,कोपरगावात खुनाचा गुन्हा !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील सोनारी शिवारात मृत अवस्थेत आढळून आलेले देर्डे-चांदवड येथील खाजगी वायरमन छबू धोंडीराम पिंपळे (वय-४२) यांचा दिनाक ३० मार्च रोजी झालेला मृत्यू हा अकस्मात नसून त्याला मारहाण झाल्याने त्याचा.. ‘तो’ झाला असल्याचा कयास पोलिसांनी विविध अहवालातून व्यक्त होत असून त्याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केल्याने ही हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी मयताचा पंचनामा केला असता मयताच्या तोंडावर डाव्या डोळ्याचे खाली व उजवे हाताचे करंगळीवर खरखचटून जखम झालेली आढळून आली होती.याशिवाय नाकातून रक्त येत होते.उजव्या डोळ्याचे भुवईवर मार लागून जखम झालेली होती.दरम्यान त्याचे वीर्यपतन झालेले आढळून आले होते.शिवाय कपड्यावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग मिळून आले होते त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,खाजगी वायरमन छबू पिंगळे यांना त्यांचे नातेवाईक तान्हाजी पिंपळे यांनी दि.३० मार्च २०२५ रोजी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.मात्र याबाबत येथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले होते.सदर इसम हे मूळ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सोमठाणे येथील असल्याची माहिती असून ते देर्डे-चांदवड येथे एकटे राहून खाजगी विद्युत पंप दुरुस्ती करण्याचे काम करत होते.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.उल्हारे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक अनुक्रमे -२३/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद दाखल केली होती.त्यानंतर घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कूसारे हे करीत होते.दरम्यान शव विच्छेदन करून पोलिसांनी मयताचे प्रेत अंत्यविधीसाठी त्यांचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते.
दरम्यान पोलिसांनी प्रेत ज्या ठिकाणी आढळून आले होते त्या सोनारी शिवारातील निवृत्ती चंद्रहार सांगळे यांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या गट क्रं.८५ घटनास्थळी भेट दिली होती आणि मयताचा पंचनामा केला असता मयताच्या तोंडावर डाव्या डोळ्याचे खाली व उजवे हाताचे करंगळीवर खरखचटून जखम झालेली आढळून आली होती.याशिवाय नाकातून रक्त येत होते.उजव्या डोळ्याचे भुवईवर मार लागून जखम झालेली होती.दरम्यान त्याचे वीर्यपतन झालेले आढळून आले होते.शिवाय कपड्यावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग मिळून आले होते.घटनास्थळी पोलिसांना रक्ताची माती आढळून आली होती.त्यामुळे या मृत्यूबाबत पोलिसांचा संशय बळावला होता.घटनास्थळापासून त्याची बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रं.एम.एच.१५ सी.एफ.१६३१) गायब झाली ती तेथून सहा ते सात कि.मी.अंतरावर दि.०१ एप्रिल रोजी दुपारी कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्यावर कुंभारी शिवारात वाल्मीक दगु चव्हाण यांचे गट क्रं.३७८ मधील शेताचे कडेला झाडाचे आडोशाला आढळून आली होती.
दरम्यान तालुका पोलिसांना मयताच्या शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्याचा मृत्यू हा मेंदूला,डोक्याला,मानेला,छातीला,तोंडाला मार लागून अनैसर्गिक झालेला असल्याचे उघड झाले होते.त्यामुळे पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून सदर मृत्यू हा मारहाणीचे झाला असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे हा मृत्यू हा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्यास मारून टाकले असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान याबाबत पोलिसांनी कलम बदलले असून आता भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१)२३८ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे मयत छबू पिंपळे कोणाशी वैर होते.मृत्यूच्या आधी त्यांचे कोणाशी भांडण झाले होते.तो एकटाच इतका दूर का आला होता.त्याचे कोणाशी अनैतिक संबंध होते का ? त्यामुळे ही हत्या झाली का असे अनेक सवाल निर्माण झाले असून याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश कुसारे हे स्वतः फिर्यादी झाले असल्याने आता यातील आरोपी शोधण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.या प्रकरणी आरोपींचा लवकरच आम्ही शोध घेऊ असे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.