जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…’त्या ‘ जटाधारी बाबाबद्दल ग्रामस्थांनी घेतला हा निर्णय !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील वायव्येस 16 कि.मी.गोदावरी काठी काही वर्षापासून प्रस्थान बसवलेल्या एका जटाधारी बाबांच्या लीला,’न्यूजसेवा’ या न्युज पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यावर काल रात्री 8.30 वाजता ग्रामस्थांनी एकत्र येत त्या पाखंडी बाबास गावातून पिटाळून दिले असल्याचे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.त्यातून अनेक महिलांचे भविष्य वाचले असल्याचे बोलले जात आहे.

  

दरम्यान या बाबाच्या जाळ्यात कोपरगाव शहरातील अजून एक मुलगी असून तिच्या पालकांनी तिच्यासह दोन दिवसापूर्वी या बाबाची भेट घेतली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.त्या पाखंडी बाबाच्या जाळ्यातून तिला वाचविण्याची गरज आहे.तो तिच्याशी लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या वायव्येस सुमारास 16 किं.मी.गोदाकाठी असलेल्या गावात ग्रामस्थांनी आपल्या लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्चून एक भव्यदिव्य रामेश्वर महादेवाचे मंदिर उभारले होते.त्यासाठी कुंभारी येथील महाराज यांनी मार्गदर्शन केले होते.मात्र सदर मंदिराच्या सेवेसाठी एकही महाराज नसल्याचे ग्रामस्थांची सल होती.त्यासाठी सदर महाराजांनी संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या जटाधारी बाबास (त्याचे मूळ नाव किरण सातपुते रा.सुकेवाडी असल्याचे समजते ) सेवेसाठी शिफारस केली होती व त्यानुसार त्यांना भाविकांना सुपूर्त केले होते.बाबांनी आपले बस्तान हळूहळू बसवले होते.बाबाची कीर्ती पसरल्याने त्यामुळे हळूहळू या मंदिरात भाविकांनी गर्दी वाढू लागली होती.महिन्याचे प्रत्येक ‘प्रदोष’ला मोठ्या संख्येनं नागरिक येत होते.गावातील प्रतिष्ठित मंडळी येत असल्याने अनेक भाविक भक्तांनी आपली पावले तिकडे वळवली होती.त्यातून बाबा नर्मदा परिक्रमा करून अनेकांचा विश्वास संपादन केला होता.त्यातून अनेक महिला बाबाच्या भक्त बनल्या होत्या,त्यातील काहींना बाबाने आपल्या वासनेची शिकार बनवली होती.त्यातील एकीने बाकीच्या महिलांचे भविष्य काळवंडू यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना जागे करून पाहिले मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यातून बाबाने आपल्या जाळ्यात बाहेर गावच्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते.त्यातून हे महाभारत घडले असल्याचे बोलले जात आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीेस सदर माहिती मिळाल्यावर त्याचा पाठपुरावा केला असता बाबाचे प्रताप बाहेर आले आहे.त्याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत काल सायंकाळी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर गावकऱ्यांना जाग आली होती.त्यातून त्यांनी काल सायंकाळी 8.30 वाजता बाबाच्या आश्रमात प्रवेश करून त्यांना आरसा दाखवला आहे.बाबास ताबडतोब आपला आश्रम सोडण्यास फर्मान सोडले असून बाबाने बघा बुवा” म्हणत बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास ग्रामस्थांनी दाद दिली नाही व बाबास गावाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.बाबाने आपले चंबू गबाळ भरून तातडीने प्रस्थान केलं आहे.बाबाकडे दोन चार चाकी गाड्या असल्याची माहिती आहे.

   दरम्यान सदर बाबाने आपल्या फोन वरून ज्या महिलेने बाबाच्या लीला प्रकाशात आणल्या आहे त्या महिलेच्या पतीस मोबाईलवरून संपर्क करून,”तुमच्या बायकोने अखेर मला गावाच्या बाहेर काढले असल्या”चा सुर आवळला आहे.मात्र त्यांनी त्यास आसरा दिला नाही.त्यामुळे त्याचा भ्रमनिरास झाला आहे.
तर दुसरीकडे बाबाने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्वतःचा फोटो टाकून त्यास श्रद्धांजली अर्पण केली  होती.त्यामुळे सदर बाबा आत्महत्या करतो की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती.मात्र काही तासांनी त्याने ते स्टेटस काढून टाकले आहे.मात्र त्यांस ही कृती कोणी करावयास लावले हे समजू शकले नाही.एका माहितीनुसार बाबा फारच निर्ढावलेला असून या पूर्वीही त्याने नगर येथील एका आदिवासी अल्पवयीन मुलीचे आयुष्य बरबाद केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान या बाबाच्या जाळ्यात कोपरगाव शहरातील अजून एक मुलगी असून या संपर्कातून तिच्या भविष्याची अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.तिच्या पालकांनी तिच्यासह दोन दिवसापूर्वी या बाबाची भेट घेतली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.त्या पाखंडी बाबाच्या जाळ्यातून तिला वाचविण्याची गरज असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close