जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

 …या ठिकाणी ८.७० लाखांचे गोवंश जप्त,दोन जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या नजीक टोल नाक्याजवळ कोपरगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार लावलेल्या सापळ्यात एक पांढऱ्या रंगाचा टाटा कंपणीचा इंट्रा व्ही-३० टेंपो (एम.एच.४३ बी.एक्स.८७८५) पोलिसांनी जप्त केला असून त्यातील  विविध गोवंश जातीचे  ८.७० लाख रुपयांचे गोमांस जप्त केले असून दोन आरोपी अटक केले आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

कोपरगाव शहर पोलिसांनी कोकमठाण हद्दीत समृद्धी टोल नाक्याजनिक सापळा लावला असता त्या ठिकाणी टेंपो पोलिसांना आढळून आला त्यास ताब्यात घेतले असता त्यात ०२ लाख ७० हजार किमतीचे १७०० किलो ग्रॅम गोवंश जातीचे गोमांस,०६ लाख रुपये किमतीचा वरील वर्णनाचा माल आढळून आला आहे.

महाराष्ट्रात नऊ वर्षा पूर्वी भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍यात आला होता.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.तोपासून ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शिक्षाही होण्याची तरतूद आहे.गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍याची मागणी सात‍त्याने होत होती.मात्र नऊ वर्षांनी आज चित्र पहिले तर हा कायदा खरेच उपयक्त ठरला का असा सवाल निर्माण झाला आहे.कारण अशा घटना वारंवार उघड होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात उघड झाली असून यात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोकमठाण हद्दीत समृद्धी टोल नाक्याजनिक सापळा लावला असता त्या ठिकाणी वरील वर्णनाचा टेंपो पोलिसांना आढळून आला आहे.पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्यात ०२ लाख ७० हजार किमतीचे १७०० किलो ग्रॅम गोवंश जातीचे गोमांस,०६ लाख रुपये किमतीचा वरील वर्णनाचा टेंपो आढळून आला आहे.
दरम्यान यात दोन आरोपी मोहंमद कैफ शरीफ कुरेशी,(वय-२०)रा.कुर्ला पूर्व,रिजवान मलंग कुरेशी (वय-३६) उस्मान गल्ली कुर्ला पूर्व आदींना अटक केली आहे.

   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२१३/२०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम १९७६ चे कलम ५,९,११ भा.द.वि.कलम १८८,२७९,२७१,३४,साथ रोग अधिनियम १८९७चे कलम ३,४ प्रमाणे २ आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.घटना स्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस हे.कॉ.के.ए.जाधव हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close