जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार,आरोपीवर पोक्सो गुन्हा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी तौसिफ बागवान याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याविरुद्ध पोक्सोचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.

  

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन-२०१७ साली एका अल्पसंख्याक समाजाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा कांगावा करून मोठा मोर्चा काढून आमच्या प्रतिनिधींच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.आता एका बहुसंख्याक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून या समाजातील नेते आणि कार्यकर्ते आदी तिला न्याय देण्यासाठी किती पुढाकार घेणार ? की केवळ बघ्याची भूमिका घेणार ? असा सवाल निर्माण झाला आहे

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस चार मुलांचा बाप असलेल्या एका इसमाने ऑगष्ट २०२३ पासून गोड बोलून आपल्या वासनेची शिकार बनवली असून त्याने तिच्या गोड बोलण्याचा गैरफायदा घेतला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून सदर मुलीस त्रास होऊ लागल्याने त्या बाबत तिने आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबद आपल्या आईस माहिती होती.गत सात साडेसात महिन्या पासून होत असलेल्या त्रासाने वैतागून तिने हि बाब आपल्या आईच्या निदर्शनास आणून दिल्याने सदर घटना उघड झाली आहे.या प्रकरणी आईसह तिच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन आरोपी विरुद्ध दि.१५ एप्रिल २०२४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान हि घटना उघड आल्यावर  सदर घटना आपल्या अंगलट आल्याची बाब लक्षात आल्यावर आरोपीने पलायन केले होते.मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्यास बीड जिल्ह्यातून जेरबंद केले असून या प्रकरणी त्यास बेड्या ठोकल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

   दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.भामरे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सूरु असल्याची माहिती हाती आली आहे.

  दरम्यान त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा क्रं.१९५/२०२४ भा.द.वि.कलम ३७६,३७६(अ),लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४,८ प्रमाणे आरोपी तौसिफ बागवान याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.भामरे हे करत आहेत.

   दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पसंख्याक समाजाच्या मुलीवर जुलै २०१७ मध्ये बलात्कार झाला असल्याचा (वस्तुस्थिती तशी नसताना) आरोप करून त्यावेळी मोठे रान उठवले होते.व मोठा कोपरगाव बस स्थानकाजवळून मोठा मोर्चा आयोजित केला होता.त्यात पालकमंत्री,आमदार,खासदार आदींनी आपल्या राजकीय भाकरी भाजून घेतल्या होत्या.अ.नगर,नाशिक,मालेगाव,छ.संभाजीनगर आदी ठिकाणाहून मोठा जनसमुदाय उपस्थित राहिला होता.व “कोपरगाव को जला देंगे” च्या घोषणा दिल्या होत्या.त्यावेळी आमच्या प्रतिनिधीने वस्तुस्थिती समोर आणली होती.तर त्यावर आपली विवेकबुद्धी गहाण ठेवणाऱ्या एका गटाने थेट आमच्या प्रतिनिधींच्या कार्यालयावर समूहाने हल्ला चढवला होता.त्यात कार्यालयाचे मोठे नुकसान झाले होते.आता एका बहुसंख्याक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून या समाजातील नेते आणि कार्यकर्ते आदी तिला न्याय देण्यासाठी किती पुढाकार घेणार ? की केवळ बघ्याची भूमिका घेणार ? असा सवाल निर्माण झाला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close