जाहिरात-9423439946
शैक्षणिक

  एस.एम.एम.एस.परीक्षेत…हि शाळा राज्यात अव्वल !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय आर्थिक दुबर्ल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे १६० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून हि संख्या राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती संस्थेने आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

  

एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या शाळांमध्ये १६० विद्यार्थ्यांसह आत्मा मालिक प्रथम असून कोल्हापूरचे पी.बी.पाटील विद्यालय ७५ विद्यार्थ्यांसह द्वितीय स्थानी तर न्यू इंग्लिष स्कूल,बारगांव पिंप्री सिन्नर ही शाळा ६५ विद्यार्थ्यांसह तृतीय स्थानी आले आहे.

राज्यात एका शाळेत सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान नवव्यांदा आत्मा मालिकने मिळविला. या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे चार वर्षासाठी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.१६० विद्यार्थ्यांनी ७६ लाख ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.आत्मा मालिकचे आज पर्यंत ०१ हजार ४५३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले असून त्यांनी ०६ कोटी ९७ लाख ४४ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी २२९ विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना प्रत्येकी ३८ हजार ४००रुपयांप्रमाणे ८७ लाख ९३ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार असल्याची माहिती गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली आहे.

            एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीमध्ये सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या शाळांमध्ये १६० विद्यार्थ्यांसह आत्मा मालिक प्रथम असून कोल्हापूरचे पी.बी.पाटील विद्यालय ७५ विद्यार्थ्यांसह द्वितीय स्थानी तर न्यू इंग्लिष स्कूल,बारगांव पिंप्री सिन्नर ही शाळा ६५ विद्यार्थ्यांसह तृतीय स्थानी आले आहे.

            या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख रविंद्र देठे,सचिन डांगे,सागर अहिरे,अनिल सोनवणे,रमेश कालेकर,मिना नरवडे,बाळकृष्ण दौंड,पर्यंवेक्षक सुनिल पाटील,नितीन अनाप,नयना शेटे,विषय शिक्षक राहुल जाधव, गणेष वाघ,सोपान शेळके,अनिता वाणी,किशोर बडाख,संदिप शिंदे,पाडूरंग वायखिंडे,ज्ञानेश्वर म्हस्के,अजय कांबळे, वैशाली तांबे,वर्षा सोमासे,पुनम खांडेकर,सोमनाथ व्यवहारे,संघर्शा बनसोडे,संग्राम जौंजाळ,दत्तात्रय गायकवाड, गणेष कांबळे,सचिन जगधने,षिवम तिवारी,अंषुमन गुप्ता,पंकज गुरसळ,राजेंद्र जाधव,वनिता लोंढे,मीना सातव, आषा देठे,अश्विनी जावळे,सर्जेंराव भुजाडे,पुनम पावसे,अंजली तिवारी,साईकुमार कावळे,पुनम राऊत,बबन जपे, बाळासाहेब कराळे,संजय कहांडळ,राजश्री पिंगळ,सुनंदा कराळे यांचे मार्गदर्षन लाभले होते.

            यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊलींसह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यंवशी,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गिरमे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदिंनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close