जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध व्यवसायावर पोलिसांची धाड,४२ हजारांचा अवैज जप्त,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अवैध व्यवसाय वाढले अशी ओरड झालेली असताना कोपरगाव तालुका पोलीस अचानक कार्यप्रवण झाले असून त्यांनी मिळालेल्या गुप्त खबरीनुसार केलेल्या कारवाईत मोतीनगर सुरेगाव येथील अवैध व्यवसाय करणारा आरोपी दत्तू जानू पिंपळे याचे विरुद्ध दारू भट्ट्या उध्वस्त करण्याची कारवाई केली यात सुमारे ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची समाधानकारक बातमी हाती आली आहे.त्यामुळे नागरिकांना हायसे वाटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील हद्दीत शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना एका खबऱ्याकडुन एक बातमी मिळाली असता त्यांनी केलेल्या कारवाईत विविध रसायन व अन्य अवैज असा सुमारे ०१ लाख २१ हजारांचा अवैज जप्त केला होता.त्यामुळे तालुका पोलिसांच्या भूमिकेवर वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस सक्रिय झाले असल्याचे दिसून आले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळाट झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप कठीण झाले आहे.काही ठिकाणी दिवसा घरफोडी झाल्या आहेत.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी काही दिवसापूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊन नागरिकांची सुटका झालेली नसताना.अवैध व्यवसायाची अशीच घटना नूकतीच समोर आली असून यात तालुक्यातील चासनळी येथील हद्दीत शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना एका खबऱ्याकडुन एक बातमी मिळाली असता त्यांनी केलेल्या कारवाईत विविध रसायन व अन्य अवैज असा सुमारे ०१ लाख २१ हजारांचा अवैज जप्त केला होता.त्यामुळे तालुका पोलिसांच्या भूमिकेवर वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस सक्रिय झाले असल्याचे दिसून आले असल्याचे दिसत आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दि.२४ जुलै रोजी टाकलेल्या धाडीत मोतीनगर येथील अवैध व्यवसाय करणारा इसम दत्तू पिंपळे याच्या हातभट्टीवर छापा टाकला होता.त्यात सुमारे ४२ हजार किमतीचे ६०० लिटर गावठी दारू बनविण्याचे कच्चे रसायन जप्त केले आहे.व त्याचा त्याच जागी नायनाट केला आहे.

दरम्यान या प्रकरणी त्यांनी आरोपी दत्तू पिंपळे रा.मोतीनगर सुरेगाव याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींनी भेट दिली आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक यांचेसह पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे,गजाजन वांढेकर,सुरेश गागरे,पो.कॉ.अविनाश तमनर,महिला पोलीस कॉ.ज्योती रहाणे,पो.कॉ.किसान सानप,पो.ना.रामचंद्र साळुंके आदींनी सहभाग नोंदवला आहे.या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

दरम्यान या प्रकरणी पहिल्या घटनेतील फिर्यादी महिला पोलीस कॉ.ज्योती दिलीप रहाणे यांनी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा अनुक्रमे क्रं.३७१/२०२३ म.प्रो.ऍक्ट कलम-६५(ई) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close