जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यातील…या हॉस्पिटलने रुग्णांसाठी दिली मोफत रिक्षा सेवा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गालगत असणाऱ्या श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना येण्या-जाण्यासाठी मोफत रिक्षासेवा चालू केली आहे.पुणतांबा फाट्यापासून जवळपास ३ किमी अंतरावर असणाऱ्या एस.जे.एस.हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ होऊ नये म्हणून हि सुविधा सुरु करण्यात आलेली आहे.त्याबद्दल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात जाण्यासाठी नजीक लोकवस्तीचा अभाव असल्याने वाहन उपलब्ध होणे कठीण बनले होते.बऱ्याच वेळा पुणतांबा फाटा परिसरात रात्री लुटमारीच्या घटना घडत होत्या.त्यामुळे भाविकांच्या दहशतीचे वातावरण होते.त्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी वाहन सुविधा उपलब्ध करून दयावी अशी मागणी केलेली होती त्याला हॉस्पिटल व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गत व वर्षी कोपरगाव शहराच्या आग्न्येय दिशेस साधारण तीन कि.मी.अंतरावर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या वतीने कोपरगाव नजीक संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात करण्यात आलेली आहे.या फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे हे इसम आहेत.मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी नजीक लोकवस्तीचा अभाव असल्याने वाहन उपलब्ध होणे कठीण बनले होते.बऱ्याच वेळा पुणतांबा फाटा परिसरात रात्री लुटमारीच्या घटना घडत होत्या.त्यामुळे भाविकांच्या दहशतीचे वातावरण होते.त्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी वाहन सुविधा उपलब्ध करून दयावी अशी मागणी केलेली होती.त्यामुळे वाहनाअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठी यातायात करावी लागत होती.रुग्णांस मोठा अडथळा पार करावा लागत होता.

या मागणीची दखल अखेर जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कातकडे आदींनी घेतली आहे.व या टप्प्यात वाहन सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांच्या व्यवस्थापनाच्या वतीने रिक्षा सुविधा निर्माण केली आहे.त्यामुळे परिणामस्वरूप कोणत्याही रुग्णाला व भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना व विद्यार्थ्यांना आता येण्याजाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था सुरू झाली आहे.हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी आता रुग्णांना कोणताही अडथळा होणार नाही.रुग्ण जर बसमधून पुणतांबा फाट्याजवळ उतरला असाल व एस.जे.एस.हॉस्पिटलमध्ये यायचे आहे.कोणतीही आपल्याकडे गाडीची व्यवस्था नसेल तर तत्काळ मो.९८९०१९५८८२ किंवा ९६२३८३९००० या नंबर संपर्क करावा असे आवाहन श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या प्रशासनाने केले आहे.

( वरील छायाचित्र संकल्पित)

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close