जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात रुग्ण वाढ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ६३० रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ३३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५९७ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ३७३ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १६ तर अँटीजन तपासणीत ३३,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात एकूण ५३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ८० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहरात एकही रुग्ण मयत झाला नाही.मात्र तालुका हद्दीत करंजी ग्रामपंचायत हद्दीत मात्र २६ वर्षीय तरुणाला आपला प्राण गमवावा लागला आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ५५० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०० हजार ७४६ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १८१ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५७ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ५३ हजार ८१५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख १५ हजार २६० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २१.४६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १० हजार ६२३ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९१.९७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ३५ हजार ९१९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १८ हजार ४७९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख १४ हजार ८४६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ५९३ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

राज्यातील रुग्णवाढ प्रथमच पंचवीस हजारांच्या दरम्यान आली असून कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असून कोरोनाने बळी जाणाऱ्यात तरुणाईचा भरणा चिंता निर्माण करणारा आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close