आरोग्य
कोपरगावात आजही तीन कोरोना बाधितांचा मृत्यू
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून त्यात एकूण बाधित रुग्ण ९ हजार ८५३ तर त्यात सक्रिय रुग्ण १०५० तर आजपर्यंत १३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.तर त्याचा मृत्यूची टक्केवारी १.३७ टक्के आहे.आज आजपर्यंत ४० हजार ८६४ रुग्णांची तपासणी तो दर दहा लाखाला ०१ लाख ६३ हजार ४६६ असा आहे.त्याचा बाधित दर २३.८१ टक्के आहे.तर आजपर्यंत बाधित होण्याचा दर २३.८१ टक्के आहे.तर बरे होणाऱ्यांची संख्या ८ हजार ५४७ असून त्यांची टक्केवारी ८७.८४ टक्के असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ९२ हजार १७८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २१ हजार ५२३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ६८ हजार ४७६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार १७८ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोरोना संच तूर्त उपलब्ध झालं असले तरी आगामी काळात शासकीय स्तरावरून ते केंव्हा मिळणार याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.रुग्णवाढीला उतार आला असला तरी मृत्युदर मात्र धक्कादाक पद्धतीने वाढला आहे.त्यामुळे आता कोपरगाव शहर येत्या १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.