जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात…या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील जवळपास १० ते १२ गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक केंद्रास मंजुरी दिली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात पोहेगाव,वारी, संवत्सर, दहेगाव बोलका, टाकळी,ब्राम्हणगाव,चासनळी असे एकूण ६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३१ प्राथमिक उपकेंद्र आहेत. माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार असल्यामुळे कोळपेवाडी,कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी,धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे-आ.आशुतोष काळे.

माजी आ. अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणेबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र २०१४ ला राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याबाबत विद्यमान शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही मात्र २०१९ ला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच आ.आशुतोष काळे यांनी सदर प्रस्तावाचा पाठपुरावा सुरु केला होता.त्या पाठपुराव्याची दखल घेऊन आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच मंजुरी दिली आहे.कोपरगाव तालुक्यात पोहेगाव,वारी, संवत्सर, दहेगाव बोलका, टाकळी,ब्राम्हणगाव,चासनळी असे एकूण ६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३१ प्राथमिक उपकेंद्र आहेत. माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार असल्यामुळे कोळपेवाडी,कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी,धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

मागील वर्षापासून आलेल्या कोरोना विषाणूने आरोग्य मर्यादा स्पष्ट केल्या असून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी भविष्यात आरोग्य सेवा अत्यंत महत्वाची आहे. त्यादृष्टीने नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थ संकल्पात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ११ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना मोफत रुग्णसेवेचा लाभ होणार आहे.सर्पदंश,श्वानदंश लस तसेच विविध लसीकरणासोबतच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोठा उपयोग होणार असून आ.काळे यांच्या प्रयत्नातून आरोग्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.त्यामुळे माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close