आरोग्य
कोपरगावात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा उच्चान्क !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतात गेल्या चोवीस तासात देशात १७ हजार ७२१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून १३३ जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या चोवीस तासात 20,652 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सोमवारी कोरोनाच्या 15,388 रुग्णांची भर पडली होती.आता त्यात कोपरगावच्या रुग्णांची भर पडली आहे.
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार १८२ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ११८असून आज पर्यंत ४८ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.५१ टक्के आहे.तर एकूण २१ हजार ७९१ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ८७ हजार १६४ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १४.६० टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ०१६ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ९४.७८ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख ३८ हजार ३९८ वर पोहोचली आहे.आतापर्यंत एकूण २० लाख ८९ हजार २९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर राज्यात एकूण ९५ हजार ३२२ सक्रिय रुग्ण आहेत.सध्या ०४ लाख ४१ हजार ७०२ जण घरीच विलगीकरणात असून ०४ हजार ०९८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण १३ बाधित रुग्णांत समतांनगर पुरुष वय-६८,टिळकनगर येथील महिला वय-२९,इंदिरा पथ पुरुष वय-३८,महादेवनगर महिला वय-२१,बाजार तळ महिला वय-३५,साई नगर पुरुष वय-५७,धारण गाव रोड कोपरगाव पुरुष वय-६६,सुभाषनगर पुरुष वय-४१,महिला वय-५५,शिंगी-शिंदे नगर पुरुष वय-५८,सप्तश्री मळा महिला वय-६७,संजीवनी कारखाना पुरुष वय-३८,निवारा महिला वय-६५,आदींचा समावेश आहे.
तर तालुक्यात आज आलेल्या आकडेवारीत बाधित २० रुग्णांत धामोरी पुरुष वय-५८,करंजीत ०४ महिला वय-२०,३०,३४,५० तर वारी महिला वय-८२,कोळपेवाडी पुरुष ०५ पुरुष वय-४९,५४,२१,६७,५०,तर महिला वय-५०,१५, आदींचा समावेश आहे.तर बहादराबाद येथे ०२,पुरुष वय-६९,३१,तर लौकी पुरुष वय-४९ तर साखरवाडी पुरुष य-६३,संवत्सर महिला वय-२२,पुरुष-२२,आदींचा समावेश आहे.या शिवाय तळेगाव मळे पुरुष वय-५५, समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.