जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात अल्पशी रुग्णवाढ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २९ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०२ रुग्ण बाधित तर नगर येथे तपासणीसाठी ०० स्राव पाठवले आहे.तर आधी भरती असलेल्या ०३ रुग्णांस उपचारानंतर सोडून दिले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ६७ हजार ६५३ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १०१९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिकची रुग्ण वाढ थांबली आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात ०२ बाधीत रुग्ण असून त्यात ब्रिजलाल नगर येथील एक महिला वय- ०७ व निवारा येथील ४३वर्षीय महिला बाधित आढळली आहे.

तर ग्रामीण भागात तालुक्यात आज एकही रुग्ण बाधित आढळला नाही.त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ६१२ इतकी झाली आहे.त्यात ४४ रुग्ण सक्रिय आहेत.त्यामुळे आज पर्यंत ४३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६४ टक्के आहे.आतापर्यंत १८ हजार ४६१ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ७३ हजार ८४४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १४.५१ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार ५२६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९६.७० टक्के झाला आहे.दरम्यान काल शहरी भागात आज रुग्ण वाढ रोखली असल्याचे दिसत आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close