जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोना वाढ !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २८ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०५ रुग्ण बाधित तर नगर येथुन आलेल्या अहवालात ०१ स्राव बाधित आला आहे.तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात ०४ रुग्ण असे एकूण १० रुग्ण बाधित आले आहे.तर उपचारानंतर १० जणांस घरी सोडून देण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५८ हजार ६९४ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली ९०८ आहे.कोपरगाव तालुक्यातील गत काही दिवसातील रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काळात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण होते आता मात्र ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.

दरम्यान कोपरगाव शहरात आज इंदिरा पथ येथील एक पुरुष रुग्ण वय-१७ ,एक महिला वय-४३,असे दोन बाधित रुग्ण आढळले आहे.तर ग्रामीण भागात सुरेगाव येथे ०२ रुग्ण त्यात एक पुरुष रुग्ण वय-०५,तर एक महिला वय-३०,तर चासनळी येथे दोन रुग्ण त्यात चार रुग्ण त्यात तीन पुरुष वय-४६,४२,४२, तर महिला वय-६१ तर कोळापेवाडी येथे एक महिला वय-५६,जेऊर पाटोदा येथे एक महिला रुग्ण वय-१४ असे ०८ रुग्ण बाधित आढळले आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार २२३ इतकी झाली आहे.त्यात २८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.६६ टक्के आहे.आतापर्यंत १२ हजार ८६३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ५१ हजार ४५२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.२८ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ०२ हजार १५७ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९७.०३ टक्के झाला आहे.दरम्यान शहरी भागात रुग्ण कमी झाले आहे तर ग्रामीण भागात रुग्ण वाढले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास पूर्ण रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close