जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना संख्या पुन्हा वाढली,दोन नगरसेवकही बाधित !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत बारा रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या ९७ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये ३१ रुग्ण बाधित झाले आहे तर ७२ संशयियित निरंक आले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून यात नगर येथे पाठवलेले अहवाल प्राप्त झाले असून यात ६ जण बाधित आढळले आहे. ८६ संशयीत्यांचे अहवाल निरंक आले आहे,तर उपचारानंतर १७ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून एकूण ३१ बाधित रुग्णांत कोपरगाव शहरातील एकूण सतरा बाधित रुग्ण असून ग्रामीण भागातील १४ रुग्ण बाधित आढळले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०६ हजार १९३ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २९ लाख ७९ हजार ५६२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५५ हजार ९५० वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०६ लाख ५७ हजार ४५० वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २१ हजार ६९८ वर जाऊन पोहचला आहे.

नगर येथुन आलेल्या बाधित रुग्णांच्या अहवालात तहसील कार्यालयाजवळ एक ४५ वर्षिय पुरुष,निवारा कॉर्नर येथील ३४ वर्षीय महिला,धारणगाव येथील ३० वर्षीय पुरुष,सोनेवाडी येथील ६० वर्षीय पुरुष,काळे मळा येथील ५० वर्षीय महिला,निवारा येथील ३८ वर्षीय पुरुष आदी सहा जणांचा समावेश आहे.तर अन्य अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये बाधित आलेल्या रुग्णांत टिळकनगर येथील पुरुष-२९ वर्षीय तरुण,दत्तनगर पुरुष-५९,कोकमठाण पुरुष-४३,तर १७ वर्षीय तरुण ,महिला-३७,निवारा कॉर्नर-तरुण-११,गांधीनगर पुरुष-२१,महिला-४०,५७ कासली वाल कंपाऊंड पुरुष-५२,धारणगाव महिला-२३,पुरुष-६३,आपेगाव पुरुष-४४,महिला-४०,५५ येसगाव तरुण-२५,भोजडे महिला-२५,शिंगणापूर महिला-६८,२५,शिवाजी रोड पुरुष-५२,कर्मवीरनगर पुरुष-४०,संजयनगर मुलगी-१३,हनुमानगर पुरुष-३२,बौद्धविहार तरुण-२७,सराफ बाजार पुरुष-७५, आदी बाधित रुग्णांचा समावेश आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १५ हजार ३४९ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १९३ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत दोन दिवसात सलग प्रतिदिन दोन असे चार मृत्यू झाले आहे.तर मागील आठवड्यात मोदी मंच समर्थक माजी नगरसेवक तर काल दत्तनगर येथील एक नगरसेवक व आज गांधीनगर येथील माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक असे दोन नगरसेवक कोरोना बाधित आढळल्याची माहितगार सूत्राकडून मिळाली आहे.त्यामुळें नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ५९५ इतकी झाली आहे.त्यात १८४ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत १२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर २.०१ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार ०२३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १२ हजार ०९२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १९.६८ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३९९ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६७.०५ टक्के झाला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close