जाहिरात-9423439946
कृषी विभाग

मुर्शतपुर येथे कृषीदूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(शंतनू जवरे )

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायत हद्दीत नुकतेच मालदाड ता.संगमनेर येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत हर्षल धुळे यांनी ग्रामीण व औद्योगिक कार्यानुभव-२०२० च्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

कृषिदूत हर्षल धुळे यांनी येथील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले आहे.त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करण्यासोबतच कृषी क्षेत्राशी निगडित विविध पार्त्यक्षिके उपस्थितांना करून दाखविली आहे.त्यात त्यांनी शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे महत्व,बोर्डो पेस्ट बनवणे,निमसिड आदींचे प्रात्यक्षिक करताना भ्रमणध्वनी वरील कृषी क्षेत्राशी निगडित विविध अँपची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देऊन त्याचे महत्व पटवून दिले आहे.

राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमशक्ती महाविद्यालय कार्यरत आहे.या महाविद्यालयाच्या मार्फत विद्यार्थ्यांचा ग्रामीण जागरूकता व औद्योगीक कार्यानुभव अभ्यास दौऱ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते.या वर्षी कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर या गावाची निवड करण्यात आली होती त्या अंतर्गत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी कृषिदूत हर्षल धुळे यांनी येथील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले आहे.त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करण्यासोबतच कृषी क्षेत्राशी निगडित विविध पार्त्यक्षिके उपस्थितांना करून दाखविली आहे.त्यात त्यांनी शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे महत्व,बोर्डो पेस्ट बनवणे,निमसिड आदींचे प्रात्यक्षिक करताना भ्रमणध्वनी वरील कृषी क्षेत्राशी निगडित विविध अँपची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देऊन त्याचे महत्व पटवून दिले आहे.या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एल.हारदे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एन.पी.तायडे,कार्यक्रम अधिकारी प्रा.के.जी.नवले,प्रा.एन.बी.शिंदे,प्रा.एस.एम.कानवडे,प्रा.टी.डी.साबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close