आरोग्य
कोपरगावात पुन्हा रुग्ण आढळले,नागरिकांत भीती
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात सुरेगाव व करंजी नंतर वेळापूर व कोकमठाण हि गावे बाधित झालेलीच असताना आज कोपरगाव शहरात पुन्हा एकदा खडकी रास्ता लोढा मंगल कार्यालयानजीक एक ५५ वर्षीय इसम व सहजानंदनगर येथील ईशान्य गडावरील आधीच संशय व्यक्त केलेला ५२ वर्षीय इसम व धारणगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक ३० वर्षीय महिला कोरोना बाधित आढल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान करंजीतील १४ जणांचा अहवाल निरंक आला आहे हि दिलासादायक बातमी आहे.
कोपरगाव शहरात पुन्हा एकदा खडकी रास्ता लोढा मंगल कार्यालयानजीक असलेल्या शुखाशांतीनगर येथील एक ५५ वर्षीय इसम व सहजानंदनगर येथील आमच्या प्रतिनिधीने संशय व्यक्त केलेला ईशान्य गडावरील ५२ वर्षीय इसम व धारणगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक ३० वर्षीय महिला आशा सेविका असे तिघे कोरोना बाधित आढळल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती त्यानंतर सुरेगाव व करंजी येथे पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना बाधित रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली होती.तर काल वेळापूर येथे एक महिला बाधित निघाली होती.आज दुपारी कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत शामवाडी परिसरात पुन्हा पुण्याहून आलेला इसम कोरोना बाधीत निघाला असताना आज सायंकाळी हि धक्कादायक माहिती हाती आली आहे.कोपरगाव शहरात पुन्हा एकदा खडकी रास्ता लोढा मंगल कार्यालयानजीक असलेल्या शुखाशांतीनगर येथील एक ५५ वर्षीय इसम व सहजानंदनगर येथील आमच्या प्रतिनिधीने संशय व्यक्त केलेला ईशान्य गडावरील ५२ वर्षीय इसम व धारणगाव ग्रामपंचायत हद्दीतील एक ३० वर्षीय महिला आशा सेविका असे तिघे कोरोना बाधित आढळल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज या परिसरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला आहे.व त्यांची रवानगी कोपरगाव येथील विलगीकरण कक्षात केली आहे.व हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते व डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.आता तालुक्यातील धारणगाव, सहजानंदनगर,सुखशांतीनगर, येथील या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले संशयित १५ जण ताब्यात घेण्यात आले आहे.आता या संशयित नागरिकांच्या अहवालाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.