आरोग्य
खरीप हंगामातील नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघ पर्जन्यछायेखाली येत असून खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पिक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी आत्तापासूनच पाठपुरावा सुरु करणार असल्याचे सूतोवाच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील मढी खु.येथे एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले आहे.
“मोफत आरोग्य तपासणी शिबीर हा स्तुत्य उपक्रम असून अशा शिबिरांचा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरजू रुग्णांना लाभ होत असून अशी शिबिरे राबविणे काळाची गरज आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यात जून ते ऑगष्ट २०२२ दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.तालुक्यातील पाच मंडलापैकी सुरेगाव आणि पोहेगाव या दोन मंडलातील शेतकऱ्यांना काही भरपाई मिळाली असून उर्वरित तीन मंडळातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने अंगठा दाखविल्याने शेतकऱ्यांत मोठी नाराजी होती त्यातून कोपरगाव तहसील कार्यलयासमोर पूर्वलक्षी प्रभावाने मिळावी व भेदभाव करू नये यासाठी गट सप्ताहात कोपरगाव तालुका शेतकरी समितीच्या वतीने,’आमरण उपोषण’ सुरु केले होते.या पार्श्वभामीवर हा वक्तव्याकडे पाहिले जात आहे.निमित्त मात्र कोपरगाव तालुक्यातील मढी खु.येथे आ. काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसाध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोळपेवाडी व आ.आशुतोष काळे मित्र मंडळ यांच्या वतीने मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचे होते.
सदर प्रसंगी डॉ.कोळपे नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रकाश कोळपे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे,सुभाष आभाळे,मोहनराव आभाळे,भाऊसाहेब कुऱ्हाडे,अजय गवळी, उत्तमराव कुऱ्हाडे,सुधाकर कुऱ्हाडे,श्रीधर आभाळे,सोपान आभाळे,राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,सरपंच सुनील भागवत,उपसरपंच लीना आभाळे,बिपिन गवळी,भारत आभाळे,मोहन वाकचौरे,प्रकाश आभाळे,जिजाबापू आभाळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मोफत आरोग्य तपासणी शिबीर हा स्तुत्य उपक्रम असून अशा शिबिरांचा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरजू रुग्णांना लाभ होत असून अशी शिबिरे राबविणे काळाची गरज आहे.संपूर्ण मतदार संघातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला पडलेल्या अत्यल्प पावसावर खरिपाच्या पेरण्या केलेल्या आहेत.परंतु पावसाळा सुरू होवून जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी होत असून खरीप पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे.जर येत्या चार दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडेल अशी आशा आहे.परंतु जर पाऊस पडलाच नाही तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे अशा लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची पिक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आत्तापासूनच पाठपुरावा करणार असल्याचे शेवटी आ.काळे यांनीं सांगितले आहे.आता आगामी काळात याचे परिणाम तालुक्यातील शेतकऱ्यांना दिसणार आहेत.
या कार्यक्रमात मागील गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला जिल्ह्यात सर्वाधिक दर दिल्याबद्दल आ. काळे यांचा उपस्थित शेतकऱ्यांनी सत्कार केला.कार्यक्रम प्रसंगी वैजापूरचे आ. प्रा.रमेश बोरणारे यांनी योगीराज श्री सदगुरु गंगागिरीजी महाराज यांच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण आ.काळे यांना दिले आहे.