जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात…इतक्या दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांगांना विशेष सुविधा उपलब्ध करून देवून जिल्हा रुग्णालयात तपासणी करून आजपर्यंत ४०० पेक्षा जास्त दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिले आहे असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

“या पुढील काळातही हि सेवा अशीच सुरु ठेवून मतदारसंघातील प्रत्येक दिव्यांगाला दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू.मतदार संघातील ज्या दिव्यांगांना आजपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी मागील दोन वर्षापासून मतदार संघातील दिव्यांगांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या दिव्यांगांना आ.आशुतोष काळे यांच्याकडून मोफत वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.या मोफत वाहन व्यवस्थेमुळे मतदार संघातील अनेक दिव्यांग बंधू-भगिनींची मोठी सोय होवून जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी येणारी अडचण दूर होवून आज पर्यंत ४०० पेक्षा जास्त दिव्यांगांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळवून देवून सरकारी योजनांचा फायदा मिळू लागला आहे.

मागील आठवड्यात देखील जवळपास ५० दिव्यांग बंधू-भगिनी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून आले आहेत.त्यांना आ.काळे यांच्या हस्ते दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

दरम्यान या पुढील काळातही हि सेवा अशीच सुरु ठेवून मतदारसंघातील प्रत्येक दिव्यांगाला दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू.मतदार संघातील ज्या दिव्यांगांना आजपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आ. काळे यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close