जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या परिसरातील प्रश्न आगामी काळात सोडवणार-आ.काळें

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघातील गावांचा विकास करतांना सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवतांना करंजी व परिसरातील विकासाचे प्रश्न सोडविले असून यापुढील काळात देखील उर्वरित विकासाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“मतदार संघाचा विकास साधतांना मागील काही वर्षापूर्वी प्रलंबित असलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढला.रस्ते,पाणी,आरोग्याचे महत्वाचे प्रश्न सोडविले असून मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासाला प्राधान्य दिले.यापुढील काळात देखील विकासाचे उर्वरित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न सुरु ठेवणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव तालुकयातील करंजी येथे २० लक्ष रुपये निधीतून करंजी ते बोकटा (ग्रा.मा.७५) रस्ता डांबरीकरण करणे,२० लक्ष रुपये निधीतून ओगदी ते करंजी (ग्रा.मा.१७) रस्ता डांबरीकरण करणे व १९ लक्ष रुपये निधीतून जिल्हा परिषद शाळा दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम आदी कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कारभारी आगवण,माजी जि.प.सदस्या विमलताई आगवण,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक संजय आगवण,चांगदेव आगवण,सांडूभाई पठाण,गोपाल कुलकर्णी,उत्तमराव गायकवाड,एकनाथ फफाळे,सरपंच छबुराव आहेर,नामदेव भिंगारे,नारायण भारती,संदीप ढवळे,माणिकराव गायकवाड,आबासाहेब शिंदे,रमेश गुंजाळ,भाऊसाहेब गव्हाणे,पोलीस पाटील अनिल चरमळ,बळीराम जोर्वेकर,कैलास चरमळ,वसंत आरखडे,ज्ञानदेव आगवण,नारायण आगवण,संतोष आगवण,मुख्याध्यापक चंद्रकांत माळी,नंदकुमार थोरात,ज्ञानोबा चव्हाण आदी मान्यवरांसह सप्तशृंगी मित्रमंडळ करंजीचे सदस्य,ग्रामस्थ व विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मतदार संघाचा विकास साधतांना मागील काही वर्षापूर्वी प्रलंबित असलेल्या विकासाचा अनुशेष भरून काढला.रस्ते,पाणी,आरोग्याचे महत्वाचे प्रश्न सोडविले असून मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासाला प्राधान्य दिले.यापुढील काळात देखील विकासाचे उर्वरित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असून मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी आपण सदैव कटिबद्ध व प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आ.काळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक कारभारी आगवण यांनी केले तर सूत्रसंचालन सरपंच छबूराव आहेर यांनी केले तर आभार संजय आगवन यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close