शैक्षणिक
कोपरगावात विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कालांश राजगिरा लाडू,डेली सुपर मार्केट आणि रंगकला प्रोडक्शन तसेच कोपरगाव लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे नुकतेच शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आले आहे.
कोपरगाव शहरातील कालांश उद्योग निर्मित,समता पतसंस्था आयोजित आणि रंगकला प्रायोजित भव्य रांगोळी स्पर्धेचे बक्षीस दि.११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कोपरगाव येथिल समता पतसंस्था येथे वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजडे येथील ७० गरजू मुला मुलींना शालेय दप्तराचे वाटप आणि राजगिरा लाडू चे खाऊ वाटप करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव लिओचे अध्यक्ष लिओ सुमित सिनगर,लियो राहुल नाईक लिओ,रोहित काले,तसेच लायन्सचे लायन्स तुषार आहेर लायन्स कैलास नागरे आणि लायन्स तुषार घोडके उपस्थित होते.
या उपक्रमासाठी बॅग स्पॉन्सर कालांश उद्योगचे रोहित काले,रंगकला एडिट आणि प्रोडक्शनचे रोहित रावकर तसेच डेली सुपर मार्केटचे निकेतन देवकर,सुहासिनी कोयटे,मनीषा काले,अनु रावकर,रोहित रावकर (रंगकला),विनय काले,कमलेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठीचे सहकारी किरण कोळजे योगेश वाडेकर साईराज दवंगे,दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लब आणि लिओ क्लब हा उपक्रम राबवत आहे.
विजेत्यानीं कालांश उद्योग निर्मित,रंगकला व समता पतसंस्थेचे आभार व्यक्त केले आहे.