जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्र निर्माणासाठी जगणे हाच छत्रपती शिवरायांचा आदर्श-शिव व्याख्याते

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पूजनाचा विषय नसून आचारणाचा आदर्श राजा म्हणून आपण ओळखतो.युवा पिढीने आध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत निष्कलंक जीवनशैली अंगिकारुन राष्ट्र निर्माणासाठी जगणे हाच छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांनी कोपरगाव येथील एका व्याख्यानात केले आहे.

“मातृशक्तीची ताकद मोठी आहे.निर्माण,संगोपन,संस्कार या शक्ती मातृशक्तीत सामावले आहे.राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज संस्काराने घडविले.त्यामुळेच शिवाजी महाराज यांना अठरापगड जातींसह प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळालेले पहावयास मिळते”-डॉ.शिवरत्न शेटे,राहुरी.

कोपरगांव येथील प्रियदर्शिनी ग्रामीण महिला मंडळ,लोणी संचलित बी.एस्सी.(होमसायन्स) व बी.सी.ए.महिला महाविद्यालयात सूर्यतेज संस्था कोपरगाव यांच्या सहभागातून भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,स्वच्छतादूत सुशांत घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मातृशक्तीची ताकद मोठी आहे.निर्माण,संगोपन,संस्कार या शक्ती मातृशक्तीत सामावले आहे.राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज संस्काराने घडविले.त्यामुळेच शिवाजी महाराज यांना अठरापगड जातींसह प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळालेले पहावयास मिळते.डॉ.शेटे पुढे म्हणाले,विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन करावे.अध्यायनाच्या वेळेत वाढ करुन आपल्या सर्वोच्च सेवेत जाण्याचा संकल्प करत नोकरीत लाच न स्वीकारण्याची शपथ घेण्याचे सांगितले.आयुष्यात जगायचेच तर राष्ट्रासाठी जगा जनसामान्यांचे वाली व्हा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,पद्मश्री विठ्ठलराव विखे,पद्मभूषण बाळासाहेब विखे,स्व. नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे यांचा राजेश परजणे यांनी सन्मान केला आहे.

उपस्थितांचे स्वागत राजेश परजणे पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सोनाली मोरे,प्राची रोकडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ.मनोजकुमार लंगोटे,समन्वयक डॉ.किसन थेटे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिकांनी परिश्रम घेतले.स्वागतगीत श्रध्दा त्रिभुवन,श्रेया दवंगे,प्रतिक्षा आव्हाड यांचे समुहाने गायले.तर उपस्थितांचे आभार प्रा.पूनम जिबकारे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close