जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील…या गावांचा दफन भूमीचा प्रश्न सोडवला !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील करंजी व कोळगाव थडी येथे मुस्लिम दफनभूमीचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला असून या गावातील नागरिकांनी त्या बाबत समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील मुस्लीम बांधवांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यांनी करंजी व कोळगाव थडी येथे मुस्लिम दफन भूमीसाठी जागा मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्यातून या दोनही गावांना मुस्लिम दफन भूमीसाठी जागा मंजूर करून करण्यात आली आहे.त्याबाबतचे आदेश नुकतेच करंजी व कोळगाव थडी ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील करंजी व कोळगाव थडी येथे मुस्लिम दफनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मुस्लीम बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.त्याबाबत त्यांनी आ.काळे यांच्याकडे येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचून मुस्लिम दफनभूमीसाठी जागा मिळावी अशी मागणी केली होती.मुस्लीम बांधवांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यांनी करंजी व कोळगाव थडी येथे मुस्लिम दफन भूमीसाठी जागा मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्यातून या दोनही गावांना मुस्लिम दफन भूमीसाठी जागा मंजूर करून करण्यात आली आहे.त्याबाबतचे आदेश नुकतेच करंजी व कोळगाव थडी ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले आहे.हा महत्वाचा प्रश्न सोडवून मुस्लीम कब्रस्थानसाठी जागा मिळवून दिल्याबद्दल करंजी व कोळगाव थडी येथील मुस्लिम बांधव व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला आहे.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे,कारभारी आगवण,सांडूभाई पठाण,मानेखा पठाण,फिरोज पठाण,रज्जाक पठाण,मुख्तार शेख,अकिल शेख,बालम पटेल,मुस्ताक पटेल,अश्पाक इनामदार,जावेदभाई पठाण,तसेच कोळगाव थडी येथील उपसरपंच सुनील चव्हाण,सोमनाथ चव्हाण,कैलास लूटे,नंदकिशोर निंबाळकर,दिनकर वाकचौरे,हुसेन शेख,कलंदर सय्यद,महंमद शेख,मौलाना हसन पठाण,अन्वर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close