जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

यशस्वी होण्यासाठी मिळालेली जबाबदारी पार पाडा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल कोणते काम लहान,कोणते काम मोठे याचा विचार करू नका.यशस्वी होण्यासाठी मिळालेली जबाबदारी मनापासून पार पाडा असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी माजी आ.अशोक काळे यांनी ४ कोटी ६५ लाख निधी दिला.मात्र २०१४ पर्यंत काम पूर्ण झाले नाही.२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात या इमारतीकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.याची दखल घेवून २०१९ ला निवडून आल्यापासून या इमारतींच्या उर्वरित कामासाठी निधी मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून २ कोटी ६८ लाख निधी आणला त्यापैकी १ कोटी ६० लाख रुपयांचे काम पूर्ण झाले आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री चक्रधर स्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा ‘दीक्षांत समारंभ’ नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी संजय भन्साळी,हिरालाल महानुभाव,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे,प्राचार्य शिवकुमार जुमनाके,प्राचार्य चेतन गाढवे,प्राध्यापक बाळासाहेब शिंदे,माजी नगरसेवक रमेश गवळी,फकीर कुरेशी,चंद्रशेखर म्हस्के आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी माजी आ.अशोक काळे यांनी ४ कोटी ६५ लाख निधी दिला.मात्र २०१४ पर्यंत काम पूर्ण झाले नाही.२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात या इमारतीकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.याची दखल घेवून २०१९ ला निवडून आल्यापासून या इमारतींच्या उर्वरित कामासाठी निधी मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून २ कोटी ६८ लाख निधी आणला त्यापैकी १ कोटी ६० लाख रुपयांचे काम पूर्ण झाले आहे.अजूनही १ कोटी ८ लाखाचे रस्ते,पेव्हिंग ब्लॉक व इतर सुविधाचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विज पुरवठ्याच्या अडचणी सोडवूण नवीन कोर्स सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.यावेळी त्यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close