शैक्षणिक
गरजेनुरूप विद्यार्थ्यांनी शिक्षणामधील तंत्रे आत्मसात करावी-डॉ.कुमार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना पश्चात वाणिज्य विषयाचे शिक्षण घेतल्यानंतर व्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत.त्यानुसार व्यवसायाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांनी वाणिज्य शिक्षणामधील विविध तंत्रे आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.स्वागत कुमार यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या नवकल्पना विकसित करून बिजनेस इनक्युबॅशन च्या माध्यमातून नवीन स्टार्ट अप सुरू करून उद्योजक बनले पाहिजे.यासाठी जिद्द ठेवून काम केले पाहिजे,क्षमता निर्माण केल्या पाहिजे.त्याचबरोबर नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनले पाहिजे”-प्रा.डॉ.श्याम साळुंखे.
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने वाणिज्य मंडळ व उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन रमादेवी महिला विद्यापीठ भुवनेश्वर ओडिसा येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.साबत कुमार दिगल व कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या अ.र.भा.गरुड महाविद्यालय,शेंदुर्णी येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी प्रा.धनवटे,प्रा.आव्हाड,प्रा.गुंजाळ,प्रा.रणधीर,प्रा.माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ.श्याम साळुंखे यांनी ‘बिझनेस इनक्युबॅशन व उद्योजकता विकास’ या विषयावर व्याख्यान देताना,” विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या नवकल्पना विकसित करून बिजनेस इनक्युबॅशन च्या माध्यमातून नवीन स्टार्ट अप सुरू करून उद्योजक बनले पाहिजे.यासाठी जिद्द ठेवून काम केले पाहिजे,क्षमता निर्माण केल्या पाहिजे.त्याचबरोबर नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनले पाहिजे असे प्रतिपादन केले आहे.
यावेळी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी पाहुण्यांचे स्वागत करून महाविद्यालयाची वैशिष्ट्ये व गुणवत्ता उंचावण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती मान्यवरांना करून दिली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रवींद्र जाधव यांनी केले तर उपक्रमांची माहिती वाणिज्य विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एस.आर.पगारे यांनी उपस्थितांना करून दिली उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.एस.एल.अरगडे यांनी मानले आहे.