जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी साजरी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले.ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.भाऊराव पाटील यांना १९५९ साली त्यांच्या कार्याबद्दल ‘पद्मभूषण’ हा पुरस्कारही मिळाला.त्याची पुण्यतिथी कोपरगावसह सर्वत्र साजरी करण्यात येते.

भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले.ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.भाऊराव पाटील यांना १९५९ साली त्यांच्या कार्याबद्दल ‘पद्मभूषण’ हा पुरस्कारही मिळाला. त्यांची पुण्यतिथी नूकतीच सर्वत्र साजरी करण्यात आली आहे. त्या निमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते.कोपरगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयांत त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे.

सदर प्रसंगी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.विजय निकम,शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख,अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुनील सालके आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप वर्पे यांच्या हस्ते कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी कर्मवीरांचे विचार, कार्य व त्यागशिल भावना विचारात घेऊन वाटचाल करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी या प्रसंगी मांडले.
महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष रणधीर यांचे व्याख्यानही यावेळी आयोजित करण्यात आले होते.

आपल्या व्याख्यानात बोलताना ते म्हणाले की,”आद्य समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा कृतिशील विचार प्रत्यक्ष आमलात आणण्याचे कार्य निस्सीम त्यागातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले.कोणतीही सुधारणा ही मुळापासून घडवायची असते.अण्णांनी पीडित अस्पृश्यांपासून सुधारणा कार्याची सुरुवात केली.त्यांनी सर्व प्रकारचे भेद नाकारत समतेचा वारसा पुढे चालविण्याचे अलौकिक कार्य केले. कर्मवीरांची कमवा आणि शिका ही योजना देशपातळीवर प्रतिष्ठा पावली.या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात श्रमप्रतिष्ठा जोपासली जावी हा अभिनव आदर्श त्यांनी निर्माण केला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सूत्रसंचलन डॉ.बी.बी.देवकाते यांनी केले तर प्रा.सुनील काकडे यांनी आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close