कोपरगाव तालुका
आ. काळेंनी कुटुंबासोबत व्यक्त केली कृतज्ञता
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
यावेळी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, अभिषेक काळे,आयांश काळे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे तसेच राज्यसरकार व प्रशासन अतिशय उत्तमरीत्या कोरोनावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून देशाप्रती असलेले आपले कर्तव्य चोखपणे पार पडले असून आपली जबाबदारी पार पाडली असली तरी आपल्यापुढील संकट मात्र टळलेले नाही. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.ज्याप्रमाणे सर्व नागरिकांनी आज सहकार्य केले आहे त्याच सहकार्याची अपेक्षा यापुढे सर्व नागरिकांकडून आहे.सर्व नागरिक समजूतदार असून शंभर टक्के सहकार्य करणार याची मला खात्री आहे.आपण आपल्या सर्वांच्या एकजुटीने आपल्या देशावर आलेल्या या संकटावर निश्चितपणे मात करनार आहोत यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व सरकारी सूचनांचे पालन करावे असे आ. काळे यांनी शेवटी म्हटले आहे.