जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या बस आगारातील गाळे पूर्ण मात्र अजून गाळे बांधण्याची गरज !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरातील सन-२०११ च्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या कोपरगाव बस आगारातील दक्षिण बाजूचे व्यापारी संकुलातील ०७ गाळे बांधून पूर्ण झाले असून अजून ०७ गाळे प्रगतीपथावर आहे तर त्यावर २४ बाय २० फुटाचे हॉलचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित तेवढेच काम अद्याप बाकी असून त्या कामाची पाहणी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच पूर्ण केली असून कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे व उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यावर आशावादी व्यापाऱ्यांनी अजून तीन बाजूंनी व्यापारी गाळे बांधण्याची मागणी केली आहे.

कोपरगाव बस आगारातील दक्षिण बाजूचे व्यापारी संकुलातील ०७ गाळे बांधून पूर्ण झाले असून त्याची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी केली तो क्षण.

आ.आशुतोष काळे यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्यावर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बस आगारात व्यापारी गाळ्यांसाठी प्रशासकीय मान्यता आणली होती.आता सदर काम पूर्णत्वास जाणार असले तरी अद्याप व्यापारी संकुलासाठी उत्तर,पश्चिम बाजू आणि पूर्व बाजूस काम करता येणे शक्य असून आ.काळे यांनी या बाजूने ही व्यापारी गाळे मंजूर करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

  

कोपरगाव बस आगार

   कोपरगाव शहरात मार्च-२०११ मध्ये अतिक्रमण विरोधी मोठी मोहिम जिल्हा प्रशासनाने राबवली होती.त्यात शहरातील जवळपास दोन हजार अतिक्रमणे जमिनोध्वस्त झाली होती.त्यानंतर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा राजकीय नेत्यांच्या चर्चेच्या अग्रस्थानी येत राहिला निवडणुका झाल्या की पुन्हा तो थंड बस्त्यात जात राहिला.ज्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली होती.मात्र विधानसभा अथवा कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आली की,राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगरानजिक माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे व त्यांच्या समर्थक राजकीय नेत्यांनी अवैध रांगोळ्या काढून या आशावादी व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक केली होती.आपल्या मतपेट्या बंद झाल्या की ही मंडळी पुन्हा हा विषय पुढील निवडणुकीत निळवंडे प्रश्नासारखा घेऊन त्यातून मोठी करमणूक करत होता.त्यातून अतिक्रमणात उद्ध्वस्त झालेला व्यापाऱ्याच्या जखमेवर मीठ चोळले जात होते.मात्र सन-२०१९ साली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आगंतुक भाजप मधील आमदार पराभूत झाल्यावर मात्र निवडून आलेल्या आ.आशुतोष काळे यांनी हा प्रश्न ऐरणीवर घेतला असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी आपल्या पहिल्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हा प्रश्न राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष आणि अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करून सुमारे १४ कोटी रुपये खर्चाचे कोपरगाव बस आगाराचे वर्क शॉप,विद्युत बससाठी चार्जिंग स्टेशन,व्यापारी संकुलासाठी एकूण १४ गाळे त्यातील ०७ पूर्णत्वाकडे गेले आहे.(तर दुसऱ्या टप्प्यातील ०७ बाकी आहेत.) तर पहिल्या मजल्यावर २४ बाय २० फुटाचे ०७ हॉल चे काम प्रगती पथावर असून यातील ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.तर उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे.त्याकडे लक्ष वेधले होते व त्यास प्रशासकीय मान्यता आणली होती.आता सदर काम पूर्णत्वास जाणार असले तरी अद्याप व्यापारी संकुलासाठी उत्तर,पश्चिम बाजू आणि पूर्व बाजूस काम करता येणे शक्य असून आ.आशुतोष काळे यांनी या बाजूने ही व्यापारी गाळे मंजूर करावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

कोपरगाव बस आगारातील नवीन बसचे उद्घाटन करताना आ.काळे दिसत आहे.

   दरम्यान या कोपरगाव बस आगार शिर्डी नजीक असल्याने व शिर्डीला सर्व बस येथून सुटत असल्याने आगामी नाशिक कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याला पाठबळ पुरवले आहे.त्यातून या आगाराला राज्यातील सर्वाधिक प्रगत बस आगार बनविण्यासाठी या ठिकाणी इलेक्ट्रिक बस चार्जिंग साठी १६०० किलो वॅट वरून वाढवून ते २००० कि.वॅटचे स्टेशन बनविण्याचे काम सुरू झाले असून आहे.त्यासाठी महावितरण कंपनीकडून स्वतंत्र फिडर प्रस्तावित असून या ठिकाणी एका चार्जिंग पॉइंटला दोन बस चार्जिंग करता येणार असून एकावेळी १६  बस चार्जिंग करता येणार आहे.त्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र वीद्युत फिटर प्रस्तावित केले असून त्यासाठी राज्य सरकारने २.७२ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे.मात्र या चार्जिंग स्टेशनला आधी कोपरगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीतून मोठी वीज शिल्लक असल्याने त्या ठिकाणाहून वीज पुरवठा घेण्याचे ठरले होते व त्याचे कामही सुरू झाले होते.त्याचे विद्युत पोल उभे करून झाल्यानंतर सदर औद्योगिक वसाहतीतील पदाधिकाऱ्यानी त्याला जोरदार विरोध केल्याने सदर काम बंद केले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी या घटनेबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली असून सदर काम बंद करणारे कोण ? अशा शेलक्या शब्दात विचारणा करून त्याचा निषेध व्यक्त केला असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान यामुळे जी आर्थिक तरतूद वाढली याला जबाबदार कोण ? असा खडा सवाल विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.त्यानंतर ते निरुत्तर झाले असल्याचे आमच्या प्रतिनिधीस दिसून आले आहे.सदर कामास व्यत्यय आला नसता तर येत्या फेब्रुवारीत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्णत्वास गेले असते असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

   

राज्य सरकारने कोपरगाव बस आगारातील विद्युत चार्जिंग स्टेशनसाठी २.७२ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे.मात्र या चार्जिंग स्टेशनला आधी कोपरगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहतीतून मोठी वीज शिल्लक असल्याने त्या ठिकाणाहून वीज पुरवठा घेण्याचे ठरले होते व त्याचे कामही सुरू झाले होते.त्याचे विद्युत पोल उभे करून झाल्यानंतर सदर औद्योगिक वसाहतीतील पदाधिकाऱ्यानी त्याला जोरदार विरोध केल्याने सदर काम बंद केले त्याची झाडाझडती घेताना आ.आशुतोष काळे दिसत आहेत.

   सदर प्रसंगी महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी.पी.धांडे,कनिष्ठ अभियंता.एम.एम.संगमनेरे,राज्य परिवहन महामंडळाचे नगर येथील स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय दरेकर,राज्य परिवहन मंडळाचे तांत्रिक सल्लागार  राजेश गांगुर्डे,कोपरगाव बस आगाराचे आगा र प्रमुख अमोल बनकर आदीसह युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव,महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टचे विश्वस्त धरमचंद बागरेचा,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,मंदार पहाडे,रमेश गवळी,राजेंद्र वाघचौरे,किरण बिडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close