जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पोलिसांच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना नको-अधिकाऱ्यांना सुनावले

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अवैध धंद्यात झालेली वाढ व वाढलेल्या गुन्हेगारीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील कायदा, सुव्यवस्था धोक्यात आली असून यासाठी सर्वोतोपरी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणाचा त्रास सर्वसमान्य नागरिकांना कदापि होता कामा नये असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला नुकतेच केले आहे.

कोपरगाव तालुक्याची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तातडीच्या उपाय योजना कराव्या व दरोड्याचा तपास लवकरात लवकर करून दोषींना कडक शासन करण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे असून कोपरगाव तालुक्यात काही दिवसापूर्वी घडलेली खुनाची घटना व भुरट्या चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे-आ. काळे

कोपरगाव शहरातील गजबजलेल्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे कोलगेट एजन्सीच्या दुकानावर मंगळवार दिनांक १७ मार्च रोजी रात्री ८.३० च्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या दरोडेखोरांनी बंदुक व तलवारीचा धाक दाखवून जवळपास ७० हजाराची रोकड लुटून नेली होती. या घटनेची आ.काळे यांनी पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह घटनास्थळी जावून पाहणी केली यावेळी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले,कोपरगाव नगरपरिषदेचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, “कोपरगाव तालुक्याची कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तातडीच्या उपाय योजना कराव्या व दरोड्याचा तपास लवकरात लवकर करून दोषींना कडक शासन करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचना दिल्या.”कोपरगाव तालुक्यात काही दिवसापूर्वी
घडलेली खुनाची घटना व भुरट्या चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहावे. पोलिसांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा आ. काळे यांनी कोपरगाव पोलीस प्रशासनाला दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close