कोपरगाव तालुका
विद्यार्थ्यांना एस. टी. पासवर मुदतवाढ द्या-आ. आशुतोष काळे

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून शहर व ग्रामीण भागातील सर्वच शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली असून या दरम्यान शाळा-महाविद्यालयातिल विद्यार्थ्यांना हे सवलत पास वापरता येणार नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात यावि अशी महत्वपूर्ण मागणी आ. आशुतोष काळे यांनी परिवहन मंत्री ना.अनिल परब यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मागील अनेक वर्षापासून परिवहन मंडळाच्या एस. टी.चा उपयोग होत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना नियमितपणे पैसे भरून एस. टी. पास घ्यावा लागतो. पहिल्या पासची मुदत संपण्यापूर्वीच विद्यार्थी नवीन पास घेत असतात. मात्र अचानक उदभवलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत शाळा महाविद्यालय सुरु होणार नाही तोपर्यंत हा एस.टी.पास उपयोगात येणार नाही-आ. काळे
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “कोपरगाव विधानसभा मतदार संघात अनेक शाळा-महाविद्यालय आहेत. या शाळा-महाविद्यालयात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मागील अनेक वर्षापासून परिवहन मंडळाच्या एस. टी.चा उपयोग होत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना नियमितपणे पैसे भरून एस. टी. पास घ्यावा लागतो. पहिल्या पासची मुदत संपण्यापूर्वीच विद्यार्थी नवीन पास घेत असतात. मात्र अचानक उदभवलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत शाळा महाविद्यालय सुरु होणार नाही तोपर्यंत हा एस.टी.पास उपयोगात येणार नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी जेव्हापासून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे तेव्हापासून जोपर्यंत शाळा-महाविद्यालय सुरु होत नाही त्या कालावधीतील एकून सुट्टीचे दिवस पासधारक विद्यार्थ्यांना त्याच पासवर प्रवास करण्यास परवानगी देवून दिलासा द्यावा असे आ.काळे यांनी दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे.