जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील शिवसेना जनतेची सामाजिक बांधिलकी जपणार-उपजिल्हाप्रमुख

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या सर्व सामाजिक व विकास प्रश्नांची बांधिलकी जपणार असून आगामी काळातही त्यांच्या सोबत राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी कोपरगाव येथील विरा पॅलेस येथे आयोजित बैठकीत केले आहे.

“प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र असलेल्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत घरकुलाचा लाभ दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतीचे पाणी समन्यायी मुळे झालेला अन्याय,कोपरगाव मधील शेतीसाठी विजेचा झालेला अभाव कोपरगाव शहरात विस्थापित झालेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे पुनर्वसन आधी प्रश्नावर शिवसेनेचा लढा अविरत चालू राहील”-शिवाजी ठाकरे,तालुका प्रमुख,कोपरगाव तालुका शिवसेना.

कोपरगाव शहरात उद्या दि.०६ एप्रिल रोजी राज्यातील महाआघाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत बस स्थानक,कोपरगाव पंचायत समिती,शहर पोलीस ठाणे इमारत आदी विकास कामांचे उदघाटन सकाळी १० वाजता संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व शिवसेना यांचे मतभेत उघड झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ‘हॉटेल वीरा पॅलेस’ येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव,माजी तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे,विधानसभा कार्याध्यक्ष थोरात,संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे,निवडणूक प्रभारी अनिल नळे, उपतालुकाप्रमुख बाबासाहेब चौधरी,उपतालुकाप्रमुख रंगनाथ गव्हाणे,शिवसेना सचिव अशोक कानडे,तालुका संघटक राहुल होन,पश्चिम विभाग प्रमुख शब्बीर भाई शेख,उपतालुका प्रमुख बाळासाहेब राऊत,पंचायत समिती गण प्रमुख घनश्याम वारकर,उपतालुका प्रमुख बाबासाहेब बढे,धर्मा जावळे,सचिन असणे,मच्छिंद्र नवले,रवींद्र शेळके,आबासाहेब नळे,सागर फडे,अतुल चौधरी, रवींद्र चौधरी,राजेंद्र लहारे,कृष्णा अहिरे,चंद्रकांत भिंगारे,संजय दंडवते,विजय गोर्डे,महेश तीपायले,मच्छिंद्र बागल,विजय ताजणे,मच्छिंद्र भवर,राजू शेख,भाऊसाहेब व्होरे,देवा लोखंडे मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी दिला त्यात शेतकरी कर्जमाफी,वादळामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई,ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व शहरातील पाणीपुरवठा योजनासाठीची तरतूद,मृद व जलसंधारण विभागामार्फत केले जाणारे बंधारे दुरुस्ती व व खोदकाम कोपरगाव येथील विविध शासकीय कार्यालय त्यामध्ये बस स्थानक,पोलीस ठाणे इमारत,पंचायत समिती कार्यालय आदी विकास कामांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.शिवसेना श्रेय वादाला महत्त्व देत नसून श्रेय कोणी घेत असेल त्याच्याशी काही देणेघेणे नाही आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि ती आम्ही जपणारं आहे असेही ते शेवटी म्हणाले आहे.

यावेळी शिवसेना नेते बाळासाहेब जाधव,माजी तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे,संपर्क प्रमुख प्रवीण जी शिंदे निवडणूक प्रभारी अनिल नळे उपतालुकाप्रमुख बाबासाहेब चौधरी,उपतालुकाप्रमुख रंगनाथ गव्हाणे शिवसेना सचिव अशोकराव कानडे तालुका संघटक राहुल होन,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

यावेळी शिवसेनेच्या वतीने मा तहसीलदार,गटविकास अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक कानडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाबासाहेब बढे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close