कोपरगाव तालुका
सेना पदाधिकाऱ्यांची हत्या,सहा आरोपींवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचा पदाधिकारी सुरेश शामराव गिऱ्हे यांची निर्घृण हत्त्या केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी संवत्सर रामवाडी येथील संशयित आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यासह अन्य अनोळखी चार अशा सहा जणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरारी असून पोलिसांना अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही तपासासाठी पाच पथके विविध ठिकाणी रवाना केले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान मयत सुरेश गिऱ्हे याचे विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यासह वाळूचोरी,जुगार,असे जवळपास १० गुन्हे दाखल झालेला असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.त्यात खंडणी,लूटमार, वाळूचोरी आदी गुन्हे दाखल आहेत त्यास दोन वर्ष हद्दपार करण्यात आले होते.त्याच्या पच्छात आई,वडील,पत्नी मुले असा परिवार आहे.त्याचे शवविच्छेदन प्रवरा ग्रामीण रुग्णालयात केल्या नंतर तीन गोळ्या काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यानंतर त्याचे पार्थिव गावी अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यात सहा वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर चौफुलीवर वाळूचोरांच्या दोन टोळ्यात हाणामारी होऊन त्यात भोजडे येथील तरुणांची वाळूचोरीच्या भानगडीतून सन-२०१२ मध्ये बंटी शिनगर याच्या हत्येत संवत्सर रवी आप्पासाहेब शेटे हा एक आरोपी आहे. त्याचा या हत्येशी संबंध असल्याचे बोलले जात असून त्यानेच हि हत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेतील काही आरोपींना दहा वर्षांची शिक्षा झाली होती.तर काही आरोपी फरार झाले होते.त्यातील एक फरार आरोपी पैकी रवी शेटे याचे नाव असल्याचे कळते.तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.त्यावर अनेक गुन्हे दाखल होते.त्यातून त्याला हद्दपारही केले होते.तो पासून हा आरोपी फरार असून त्याचे व व भोजडे येथील हत्या झालेला सुरेश गिऱ्हे यांचे वाळू व्यवसायातून बिनसले होते.व ते एकमेकांच्या जीवावर उठले होते.तो पासून ते एकमेकाला पाण्यात पाहत असत.
दरम्यान पोलिसानी या प्रकरणी शिर्डी कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाणे,व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके असे पाच पथके आरोपींचा शोधात रवाना केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
रवी शेटे हा अनेक दिवसापासून मयत सुरेश गिऱ्हे याच्या मागावर होता.त्यातूनच रविवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरी आला असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या काही गुन्हेगारांनी त्यास चहा पितांनाच त्याच्या भोजडे चौकी येथील घरी गाठले व त्याने आरोपीना ओळखले व तो घरा शेजारच्या मका पिकात मागील बाजूने आपला जीव वाचविण्यासाठी पळत असताना त्यावर मागून हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या असून काही हल्लेखोरांनी तलवारीने छातीवर पुढील बाजूने वार करून त्यास जागीच ठार केले असल्याची माहिती कोपरगाव तालुका पोलिसानी दिली आहे.या गोळ्या काही घरावर व दरवाज्यावरही लागल्या होत्या.काही आरोपी पुढील दरवाजाने तर काही आरोपी हे मागील बाजूने आपापल्या लक्ष्यावर टपून बसलेले होते.पुढील बाजूने गोळीबार झाल्यावर सुरेश गिऱ्हे हा मागील बाजूने आपल्या नजीकच्या मका पिकात पळत असताना मागील दाराने हल्यासाठी टपून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यावर आपल्या पिस्तुलातून गोळ्या घातल्या त्यात सुरेश गिरे हा खाली कोसळला असताना आरोपीनी आपल्या जवळील तलवार व कोयत्याने पुन्हा छातीवर पुढील बाजूने अनेक वार केले व त्यात गिऱ्हे ठार झाल्याची खात्री पटताच तेथून मारुती स्वीफ्ट डिझायर व विनाक्रमांकाची एक बजाज पल्सर या दोन गाड्यानी वैजापूर रस्त्याने धूम ठोकली होती. आरोपी वैजापूर रस्त्याने “आपले काम फत्ते” झाल्याची मोठमोठ्याने चर्चा करत फरार झाले होते.या घटनेने कोपरगाव तालुक्यासह नगर जिल्हा ढवळून निघाला आहे.रात्रीच प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते.या घटनेने तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान आज पहाटे मयत तरुणांचे वडील शामराव भीमराव गिऱ्हे (वय-६१) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.८८/२०२० भा.द.वि.कलम ३०२,४५२,१४३,१४७,१४८,१४९ तसेच शस्र प्रतिबंध कलम कायदा कलम ३/२५,२७,७/२५,४/२५ अन्वये आरोपी रवि आप्पासाहेब शेतेव विजय खर्डे याच्या सह अन्य चार अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके हे करीत आहेत.