कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात गोळीबार,एक ठार

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे चौकी येथे आज सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास एक चारचाकी व एक दुचाकीवरून आलेल्या संशयित हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात आणि तलवारीने केलेल्या हल्ल्यात शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष सुरेश शामराव गिऱ्हे (वय-४५) हे जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्याला कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दुजोरा दिला आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
भोजडे येथील मयत सुरेश गिऱ्हे हा फरार असताना रविवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरी आला असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या काही गुन्हेगारांनी त्यास चहा पितांनाच त्याच्या भोजडे चौकी येथील घरी गाठले व त्याने आरोपीना ओळखले व तो घर शेजारच्या मका पिकात मागील दाराने पळत असताना त्यावर मागून हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या असून काही हल्लेखोरांनी तलवारीने छातीवर पुढील बाजूने वार करून त्यास जागीच ठार केले असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यात सहा वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर चौफुलीवर वाळूचोरांच्या दोन टोळ्यात हाणामारी होऊन त्यात भोजडे येथील तरुणांची वाळूचोरीच्या भानगडीतून हत्या झाली होती.त्या नंतर यातील काही आरोपींना दहा वर्षांची शिक्षा झाली होती.तर काही आरोपी फरार झाले होते.त्यातील एक फरार आरोपी पैकी ठार झालेल्या सुरेश गिऱ्हे याचे नाव असल्याचे कळते.तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.त्यावर अनेक गुन्हे दाखल होते.त्यातून त्याला हद्दपारही केले होते.तो पासून सुरेश गिऱ्हे हा फरार असताना रविवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरी आला असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या काही गुन्हेगारांनी त्यास चहा पितांनाच त्याच्या भोजडे चौकी येथील घरी गाठले व त्याने आरोपीना ओळखले व तो घरा शेजारच्या मका पिकात मागील बाजूने पळत असताना त्यावर मागून हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या असून काही हल्लेखोरांनी तलवारीने छातीवर पुढील बाजूने वार करून त्यास जागीच ठार केले असल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.या गोळ्या काही घरावर व दरवाज्यावरही लागल्या असल्याची माहिती आहे.हल्ल्यानंतर आरोपी वैजापूर रस्त्याने “आपले काम फत्ते” झाल्याची मोठमोठ्याने चर्चा करत फरार झाले आहे.त्यात एक दुचाकी विनाक्रमांकाची असल्याची चर्चा ग्रामस्थांत आढळून आली आहे.
दरम्यान हि घटना कोपरगाव तालुका पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता त्यांना घटनास्थळी सुरेश गिऱ्हे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आहे.त्याचे शव उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.या घटनेने मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे.यावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.दरम्यान हि घटना वाळूचोरांच्या दोन गटात झाली असल्याचे मानले जात आहे.मात्र हल्लेखोरांना कोणी ओळखले असल्याचे अद्याप तरी स्पष्ट झाले नाही.