आरोग्य
कोरोना बाबत कोपरगावात जनजागृती संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतात सध्या कोरोनाग्रस्त असेलेली १०७ प्रकरणं समोर आली आहेत. दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. पण जगातील १२० देशांमध्ये ज्या तीव्रतेने कोरोना व्हायरस पसरला आहे, त्या तुलनेत भारतातील रुग्णांची संख्या कमी आहे. याला नेमकं काय कारण आहे? तज्ञ्जांच्या मते, कोरोना व्हायरस चाचणीला भारतात अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.त्यामुळे सरकारच्या निर्देशाप्रमाणे कोपरगाव शहरात अशा रुग्णाबाबत नागरिकांना सजग करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरु केली असून कोपरगाव रिक्षा संघटना व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच रिक्षाचालकांनी जनजागृती करण्यात आली आहे.
कोरोना या विषाणूंचा उद्भव अद्याप निश्चित नसल्याने सर्वच चिंतेत असल्याने त्यापासून खबरदारी अवलंबणे हि बाब महत्वाची ठरत आहे.त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी या बाबत रिक्षा चालकांचे मार्गदर्शन केले. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवासी याची वाहतूक करतांना कोरोना आजाराची प्राथमिक लक्षणे आढळल्यास संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आले आहेत.तसेच वैयक्तिक आरोग्य संदर्भात योग्य ती काळजी घेणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या प्रसंगी डॉ. गायत्री कांडेकर यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका रोहिनी नाईक,नंदू नवले,रिक्षा पतसंस्थेचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,ग्रंथपाल व सामाजिक संकेतस्थळ सल्लागार योगेश कोळगे,स्वच्छतादूत व समन्वयक सुशांत घोडके,रिक्षा चालक उपस्थित होते.सर्वांनी प्राथमिक खबरदारी म्हणून तोडाला हातरुमाल बांधणे आणि नियमितपणे हात धुण्याचा निश्चय केला आहे.