कोपरगाव तालुका
लौकीतील..त्या आरोपींवर कारवाई करा-भाजपची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोपारंगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व त्यांचे भाजपचे आजी माजी पदाधिकारी व अन्य सहकारी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समक्ष भेटून दिले आहे.
सदर प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी या प्रकरणांत जे आरोपी सिद्ध होतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करू असे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिलें आहे.त्यावेळी मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायत हद्दीतील मूळ रहिवाशी असलेले मात्र वकिली व्यवसायानिमित कोपरगाव शहरातील इंदिरा पथ मार्गावरील गौरी शंकर हौसिंग सोसायटीतील रहिवाशी मच्छीन्द्र खिलारी हे कोपरगाव न्यायालयात आपला वकिली व्यवसाय करतात.त्यांची आपल्या लौकी गावात शेती आहे त्यांचा व शेजारचे शेतकरी यांचा जमिनीच्या कारणावरून वाद आहेत.त्याबाबत कोपरगाव न्यायालयात दावेही चालू आहेत.दरम्यान मच्छीन्द्र खिलारी हे आपल्या शेतात बुधवार दि.११ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या जळालेल्या पेरूच्या बागेचा पंचनामा कारणासाठी तलाठ्याला घेऊन गेले होते.पंचनामा झाल्यानंतर ते आपल्या ग.नं.१०८ मधून आपल्या घरी जात होते.त्या दरम्यान वरील आठ आरोपी हे गज,काठ्या,स्टम्प घेऊन आले व त्यांनी फिर्यादी मच्छीन्द्र खिलारी यांना स्टम्पने मारहाण केली असून व त्यांचा मुलाच्या कानास चावा घेतला आहे.व साक्षिदार यांना शेती बाबत कोर्टात चाललेल्या दाव्याच्या कारणावरून गज,काठ्यांनी मारहाण केली आहे.तसेच फिर्यादी मच्छीन्द्र खिलारी यांच्या वाहनाचे नुकसान करून दाव्याचे कागदपत्र फाडून टाकले होते.यात अड्.खिलारी पितापुत्र गंभीर जखमी झाले होते.या घटनेत दोन्ही बाजूकडून गुन्हे दाखल झाले आहेत.यावर कोपरगाव शहर व तालुका भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई ची मागणी केली आहे.
सदर प्रसंगी भाजपचे माजी शहर अध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष सतीष कृष्णाणी,माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव,बाबा सय्यद,सुभाष दवंगे, रमेश नागरे,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड, सोशल मीडिया सेलचे प्रदेश उपाध्यक्ष समीर आंबोरे, माजी शहर अध्यक्ष प्रभाकर वाणी, सुनील वायखिंडे, माजी नगरसेवक संजय कांबळे,प्रमोद पाटील, कैलास सिनगर, विजय जोशी,संजय वायखिंडे,आप्पासाहेब गुजर, सुरेश कांगोणे, अविनाश पानगव्हाणे, सतीश शेवाळे,आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.