कोपरगाव तालुका
विस्थापितांना पुन्हा गाळे द्या-पालिकेकडे राष्ट्रवादीची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात मार्च २०११ मध्ये विस्थापितांचे विखुरलेले संसार पुन्हा उभारले जावून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या उपलब्ध जागेत विस्थापित टपरीधारकांना गाळे उपलब्ध करून देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन नुकतेच कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले आहे.
कोपरगावातील विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पाठपुरावा करीत आहे. विस्थापित टपरीधारकांच्या प्रश्नाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठवून नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी व कोपरगाव नगरपरिषदेला अनेक वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवेदने देण्यात आली आहेत-सुनील गंगूले शहराध्यक्ष
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिलेल्या निवेदनात गंगूले यांनी पुढे म्हटले आहे की, विस्थापित टपरी धारकांचा प्रश्न आजही अनुत्तरीत असल्यामुळे विस्थापित टपरी धारकांना आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पाठपुरावा करीत आहे. विस्थापित टपरीधारकांच्या प्रश्नाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठवून नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी व कोपरगाव नगरपरिषदेला अनेक वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवेदने देण्यात आली आहेत. मात्र कोपरगाव नगरपरिषद विस्थापित टपरीधारकांच्या प्रश्नाबाबत उदासीन असल्यामुळे आजपर्यंत सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्यामुळे हा प्रश्न सुटू शकला नाही. कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी जागा उपलब्ध असून या जागेवर गाळे उभारून टपरीधारकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा असे दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शेवटी म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकअध्यक्ष नवाज कुरेशी, दिनकर खरे, फकीर कुरेशी,राजेंद्र आभाळे,गणेश लकारे,जावेदभाई शेख, राजेंद्र जोशी,वाल्मिक लहिरे, संदीप कपिले,रहेमान पठाण,तौफिक पठाण,प्रताप गोसावी,दीपक फुलमाळी,भाऊसाहेब डावरे,छबुराव दुशिंग,ऋषीकेश खैरनार,समीर वर्पे,गोरख पंडोरे,विवेक महाले,देविदास शिंदे,रामा पवार,रसूलखां पठाण,इम्तियाज शेख,संतोष टोरपे,गोकुळ बिडवे, आदी कार्यकते उपस्थित होते.