जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारा-मंत्र्यांकडे मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी राज्याच्या उद्योग मंत्रालयाने कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख परिसरात औद्योगिक वसाहत उभारावी अशी मागणी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांचेकडे नुकतीच केली आहे.

निवडणुकीपूर्वी आ.काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेला काही आश्वासने दिली आहेत. यामध्ये कोपरगाव शहरातील नागरिकांची पाणी टंचाईतून मुक्तता करण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करणे,बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येकडे असलेल्या दुष्काळी पट्ट्यात औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न करणार आदी आश्वासनांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आ.काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेला काही आश्वासने दिली आहेत. यामध्ये कोपरगाव शहरातील नागरिकांची पाणी टंचाईतून मुक्तता करण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करणे,बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येकडे असलेल्या दुष्काळी पट्ट्यात औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न करणार आदी आश्वासनांचा समावेश आहे.दरम्यान त्यांच्या प्रयत्नातून पाच नंबर साठवण तलावाचे खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहेत. हे काम प्रगतीपथावर असून कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये यामुळे समाधान आहे. जनतेला दिलेली सर्वच आश्वासने पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध खात्याच्या मंत्र्यांना भेटून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न मांडून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोपरगाव तालुक्यात रांजणगाव देशमुख परिसरात औद्योगिक उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होवू शकते. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून मतदार संघातील बेरोजगारांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी उद्योग मंत्र्यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघात उद्योगधंदे अत्यंत अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळत नाही. कोपरगाव तालुक्यात रोजगार मिळत नसल्यामुळे तालुक्यातील पदवीधर,तांत्रिक शिक्षण घेतेलेले युवक व अकुशल कामगार मोठ्या प्रमाणात दुसऱ्या शहरात मोठ्या प्रमाणात नोकरी व काम धंदा मिळावा यासाठी जात आहेत. मात्र दुसऱ्या शहरात मिळणारा तुटपुंजा पगार, प्रवासखर्च या युवकांच्या कुटुंबाच्या आवश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे या बेरोजगार तरुणांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हि वसाहत उभारणे अत्यंत गरजेचे आहे.या वसाहतीच्या माध्यमातून विकासाला चालना मिळणार आहे. कोपरगाव तालुक्यात रांजणगाव देशमुख परिसरात एम.आय.डी. सी. उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन देखील उपलब्ध आहे. यासाठी जमीन अधिग्रहीत करतांना त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी या जमिनी नवीन भु-संपादन कायद्यानुसार खरेदी कराव्या असे दिलेल्या निवेदनात आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे. उभारणे संदर्भात आ. आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांची भेट घेवून त्यांच्याशी हि वसाहत उभारणे संदर्भातील पूर्ततेसाठी चर्चा केली त्यावेळी डॉ. पी. अन्बलगन यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close