जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दरोड्याचा तयारीत असणारी टोळी पकडली

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

दरोड्यासह ट्रक चालकांना लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा आरोपींना साहित्यासह तलवार. स्क्रुड्रायव्हर,नायलॉन दोरी, मिरचीपुड व एका स्प्लेंडर मोटारसायकलसह श्रीरामपुर पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींकडे अक्षय हिरामण त्रिभुवन याचेकडे (एमएच-१७ सी.ए.५६३३) या नंबरची स्प्लेंडर दुचाकी व तिच्या उजव्या बाजूच्या साईड गार्ड व फुटरेसजवळ एक लोखंडी पाते व लाकडी मुठ असलेली धारदार टोकदार तलवारवजा कत्ती,मिरची पावडर व एक नायलॉन दोरी किरण जगन्नाथ चिकणे याने पळतांना एक लोखंडी धारदार व टोकदार तलवार टाकून दिली होती तीही पोलिसांनी ताब्यात घेतली.आकाश दिनकर सौदागर याचेकडे मिरची पावडर व एक नायलॉन दोरी कुर्बान ईस्माईल शेख याचेकडे स्क्रु ड्रायव्हर सापडला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि,श्रीरामपुर नेवासा रोडवरील ओव्हरब्रीज जवळ बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास रात्रीची गस्त घालतांना पोलिसांना सहा युवक संशयास्पदरीत्या आढळले. अधिक तपास केला असता त्यांच्यापैकी अक्षय हिरामण त्रिभुवन याचेकडे (एमएच-१७ सी.ए.५६३३) या नंबरची स्प्लेंडर दुचाकी व तिच्या उजव्या बाजूच्या साईड गार्ड व फुटरेसजवळ एक लोखंडी पाते व लाकडी मुठ असलेली धारदार टोकदार तलवारवजा कत्ती,मिरची पावडर व एक नायलॉन दोरी किरण जगन्नाथ चिकणे याने पळतांना एक लोखंडी धारदार व टोकदार तलवार टाकून दिली होती तीही पोलिसांनी ताब्यात घेतली.आकाश दिनकर सौदागर याचेकडे मिरची पावडर व एक नायलॉन दोरी कुर्बान ईस्माईल शेख याचेकडे स्क्रु ड्रायव्हर सापडला आहे.

या बाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पो का धनंजय चांगदेव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण जगन्नाथ चिकणे ऊर्फ बटल्या (वय २४) वर्षे ,सागर राजु त्रिभुवन (वय-२३वर्षे) दोघे रा.कांदा मार्केट पेट्रोलपंपासमोर,भिमनगर वॉर्ड नं.६,श्रीरामपुर , आकाश दिनकर सौदागर (वय-२३) वर्षे रा.सिद्धार्थनगर,वॉर्ड नं.१,श्रीरामपुर,कुर्बान ईस्माईल शेख (वय-२४), वर्षे रा.वॉर्ड नं.२,श्रीरामपुर अक्षय हिराचंद त्रिभुवन (वय-२२) वर्षे रा.गोंधवणी,वॉर्ड नं.१,श्रीरामपुर ,लहु शशिराम निकम (वय-२० वर्षे) रा. जातेगांव ता.वैजापुर जि.आैरंगाबाद यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपुर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close