जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात व्यापारी संकुलाचे उदघाटन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
गोधेगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव विकास सोसायटी संस्थेने बांधलेल्या व्यापारी संकुलाचे उद्घाटन ना.आशुतोष काळे व नामदेवराव खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या हस्ते चित्र फीत कापून करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी ना. काळे व परजणे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.संस्थेचे सचिव अशोक घेर यांनी संस्था आर्थिक अडचणीत असताना संस्थेच्या चालू अखेर वसुली करून संस्थेला पंधरा लाख नफा मिळवून दिल्याबद्दल ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गणपत भोकरे,उपाध्यक्ष सोपान रांधवणे सर्व सदस्य सरपंच आशोक भोकरे,गोदावरी संघाचे संचालक उत्तमराव माने,सुदाम पाटील कोळसे,कोपरगाव बाजार समितीचे माजी संचालक माधवराव रांधवणे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ,सभासद उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close